टीम इंडियानं इग्नोर केलेल्या बॉलरचा काउंटी चॅम्पियनशिपमध्ये जलवा, 14 धावा देत घेतले 5 बळी

 टीम इंडियात खेळण्याची संधी मिळत नसल्याने आता चहलने काउंटी क्रिकेटची वाट धरली आहे. सध्या युजवेंद्र चहल हा ‘काउंटी चॅम्पियनशिप डिवीजन 2’ च्या मॅचमध्ये खेळत असून त्याने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.

Updated: Aug 15, 2024, 02:24 PM IST
टीम इंडियानं इग्नोर केलेल्या बॉलरचा काउंटी चॅम्पियनशिपमध्ये जलवा, 14 धावा देत घेतले 5 बळी title=
(Photo Credit : Social Media)

Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहलला मागील अनेक महिन्यांपासून भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये चहलचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता मात्र त्याला शेवटपर्यंत राखीव गटातच ठेवण्यात आले. टीम इंडियात खेळण्याची संधी मिळत नसल्याने आता चहलने काउंटी क्रिकेटची वाट धरली आहे. सध्या युजवेंद्र चहल हा ‘काउंटी चॅम्पियनशिप डिवीजन 2’ च्या मॅचमध्ये खेळत असून त्याने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.

बुधवारी युजवेंद्र चहल  ‘काउंटी चॅम्पियनशिप डिवीजन 2’ च्या उर्वरित पाच मॅच आणि वनडे कप मधील शेवटच्या सामन्यात खेळण्यासाठी नार्थम्पटनशर सोबत जोडला आहे. मॅच सुरु होण्याच्या केवळ एक तासपूर्वी नॉर्थम्पटनशायरने चहल त्यांच्या टीम सोबत जोडला गेल्याचे जाहीर केले. स्टार स्पिनर युजवेंद्र चहलने मॅच सुरु होताच अजिबात वेळ वाया न घालवता 10 ओव्हरमध्ये तब्बल 5 विकेट्स घेऊन आपला प्रभाव सिद्ध केला. 

चहलची जबरदस्त बॉलिंग : 
 

34 वर्षांच्या युजवेंद्र चहलने मॅचमध्ये 10 ओव्हर टाकून तब्बल 5 विकेट्स घेतल्या. चहलच्या फिरकीचे डन डेनली (22), एकांश सिंह (10), ग्रांट स्टीवर्ट (1), बेयर्स स्वानेपेल (1) आणि नाथन गिलक्रिस्ट (6) इत्यादी स्टार बॅट्समन शिकार ठरले. चहलच्या जबरदस्त बॉलिंग समोर केंटची टीम ही 35.1 ओव्हरमध्ये 82 धावांवर ऑल आउट झाली. 

हेही वाचा : Neeraj Chopra : नीरज चोप्राला कशा मुली आवडतात? गोल्डन बॉयने स्वतः केला खुलासा

 

नॉर्थम्पटनशायरला मिळाला पहिला विजय : 

केंटची टीम ही अवघ्या 82 धावांवर ऑल आउट झाल्यावर नॉर्थम्पटनशायरला विजयासाठी सोपे आव्हान मिळाले होते. नॉर्थम्पटनशायरने केवळ 14 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून 86  धावा केल्या. हा विजय यंदाच्या सीजनमधील त्यांचा पहिला विजय होता, यापूर्वी ते सलग 6 मॅचमध्ये पराभूत झाले होते. चहलच्या आगमनामुळे त्यांना हा विजय मिळाला. चहलच्या बॉलिंगला जस्टिन ब्रॉडची सुद्धा साथ मिळाली. जस्टिन ब्रॉडने या मॅचमध्ये 3 विकेट्स घेतल्या. तर फास्ट बॉलर ल्यूक प्रॉक्टरने सुद्धा 2 विकेट्स घेतल्या होत्या. 

क्वार्टर फायनलला पोहोचली चहलची टीम : 

नॉर्थम्पटनशायरची टीम ही ग्रुप ए च्या पॉईंट टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. टीमला क्वार्टर फायनलमध्ये जागा बनवण्यात यशस्वी ठरली असून वनडे कप सोबत काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन दोनमध्ये टीम सोबत 5 सामने खेळण्यास तयार आहे.

युजवेंद्र चहलची कारकीर्द : 

34 वर्षांच्या युजवेंद्र चहलने भारताकडून आतापर्यंत 72 वनडे आणि 80 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्यांनी एकूण 217 विकेट्स घेतले. युजवेंद्र चहलने भारताकडून एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही. जवळपास एक वर्ष तो टीम इंडियाकडून मैदानात खेळण्यासाठी उतरला नाही.