रिटेन न केल्यानं युजवेंद्र चहल नाराज, मॅचमध्ये असा काढला राग, पाहा व्हिडीओ

रिटेन न केल्याचा युजवेंद्र चहलने असा काढला राग, RCB च्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Updated: Apr 8, 2022, 02:16 PM IST
रिटेन न केल्यानं युजवेंद्र चहल नाराज, मॅचमध्ये असा काढला राग, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात चुरशीची झाली आहे. राजस्थान, लखनऊ, कोलकातामध्ये कडवी लढत दिसत आहे. मैदानात अनेक किस्से घडत असतात मात्र राजस्थान विरुद्ध बंगळुरू सामन्यात एक अजब प्रकार घडला. फ्रान्चायझीनं रिटेन न केल्याचा राग खेळाडूनं काढला. 

यंदाच्या हंगामात 10 टीम आहेत. त्यामुळे बऱ्याच टीममध्ये बदल झाले आहेत. यावेळी बंगळुरू टीमने युजवेंद्र चहलला रिटेन केलं नाही. तर विराट कोहलीनं कर्णधारपदही सोडलं. त्यानंतर टीमची कमान फाफ ड्यु प्लेसिसकडे आली. युजवेंद्र चहलने गेल्या हंगामात उत्तम कामगिरी केली होती. तो बंगळुरूकडू खेळत होता. 

यावेळी युजवेंद्रला बंगळुरूने रिटेन केलं नाही. तर राजस्थान टीमने 6.5 कोटी रुपये देऊन त्याला आपल्या टीममध्ये घेतलं. बंगळुरूने रिटेन न केल्याचा राग युजवेंद्रच्या मनात अजूनही खदखदत आहे. तो राग त्याने मैदानात सामन्यावेळी काढला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की सामना संपल्यानंतर बंगळुरू टीममधील खेळाडू राजस्थानच्या खेळाडूंसोबत शेक हॅण्ड करत होते. तेव्हा युजवेंद्र चहलने या दोघांकडेही दुर्लक्ष केलं आणि तिथून निघून गेला. 

हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहल यांच्या धुसफूस असल्याने त्यांने असं केल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. युजवेंद्र चहलनेही हर्षल पटेलवर कोणती नाराजी किंवा राग असल्याचं कधी जाहिरपणे सांगितलं नाही. त्यामुळे नेमकं काय झालं असावं अशीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

युजवेंद्र चहलने बंगळुरू टीमला आपल्या बॉलिंगच्या जोरावर मॅच जिंकवून दिल्या होत्या. मात्र त्याला बंगळुरूने रिटेन केलं नाही. राजस्थान टीमने त्याला रिटेन करून खेळण्याची संधी दिली. चहलने राजस्थानला सामना जिंकवून दिला.