Yuvraj Singh Meet Rishabh Pant: सिक्सर किंग पंतच्या भेटीला; कॅन्सर फायटर युवीने दिला 'तो' मोलाचा सल्ला!

Rishabh Pant latest Photo: हरभजन असो वा विराट... युवराजने कधी आपल्या मित्रांचा हात सोडला नाही. अशातच आता युवराज सिंह (Yuvraj Singh) याने ऋषभ पंतची (Rishabh Pant) भेट घेतली. 

Updated: Mar 16, 2023, 11:27 PM IST
Yuvraj Singh Meet Rishabh Pant: सिक्सर किंग पंतच्या भेटीला; कॅन्सर फायटर युवीने दिला 'तो' मोलाचा सल्ला! title=
Yuvraj Singh,Rishabh Pant

Yuvraj Singh Meet Rishabh Pant: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याने बुधवारी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ (Video) शेअर केला होता, ज्यामध्ये तो काठीच्या साहाय्यानं तलावामध्ये एन्जॉय करताना दिसतला होता. अशातच आता ऋषभचा आणखी एक फोटो (Rishabh Pant Latest Photo) आता समोर आलाय. भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा स्टार ऑलराऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) याने ऋषभ पंतची भेट घेतली. त्यावेळीचा एक फोटो युवराजने शेअर केला आहे.

काय म्हणाला युवराज सिंह?

ऋषभला भेटल्यावर युवराज सिंग याने दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याचा कॅची कॅप्शन देखील त्याने दिलंय. On to baby steps, असं युवराज मजेशीर अंदाजात म्हणतो. हा चॅम्पियन पुन्हा उठणार आहे. ऋषभला भेटून खूप आनंद झाला आणि तो खूप सकारात्मक व्यक्ती तसेच मजेदार व्यक्ती आहे. यावर मात करण्याचे बळ मिळो, अशी इच्छा देखील युवराजने (Yuvraj Singh Meet Rishabh Pant) व्यक्त केली आहे.

पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी युवराजने ऋषभला भेटून लवकर बरा होण्यास पाठबळ दिलंय. गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारला अपघात (Car Accident) झाला होता. त्यानंतर त्याच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. मात्र, युवराजची भेट स्पेशल ठरली आहे.

पाहा PHOTO -

दिलदार युवराज

युवराज सिंग म्हणजे एकदम जॉली खेळाडू. युवराजने कॅन्सरशी (Cancer) फाईट करत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केलं. कॅन्सर आहे माहित असताना देखील युवीने 2011 चा वर्ल्ड कप खेळला... फक्त खेळलाच नाही तर युवीने भारताला वर्ल्ड कप (ODI WC 2011) जिंकवून देखील दिलाय. तर 2007 चा वर्ल्ड कप (T20 WC 2007) जिंकण्यात देखील त्याचा सर्वात मोठा वाटा होता.

मदतीसाठी युवराजचा पुढाकार

हरभजन असो वा विराट... युवराजने कधी आपल्या मित्रांचा हात सोडला नाही. ज्यावेळी विराट (Virat Kohli) फॉर्ममध्ये नव्हता. त्यावेळी युवराजने त्याचा सर्वात किंमती असा गोल्डन बुट विराटला दिला होता आणि त्याला पुन्हा विश्वासात आणण्याचं काम केलं होतं. आजही तो कॅन्सरग्रस्त मुलांसाठी यु वी कॅन (You We Can) नावाची संस्था चालवतो. त्यानंतर आता ऋषभची भेट घेऊन त्याने मनाचा दिलदारपणा दाखवला आहे.