Suryakumar Yadav : कोरोना, लॉकडाऊन आणि अनेक निर्बंध अशा दोन वर्षांच्या कठीण काळानंतक संपूर्ण जगासाठीच 2022 हे वर्ष दिलासा देणार ठरलं. 2022 साल उजाडताच जवळपास सर्वच निर्बंध हटले. पुन्हा एकदा सगळं जैसे थे झाले. त्यामुळे क्रिकेट विश्वासतही शानदार खेळी बघायला मिळालं. यामध्ये भारताने संपूर्ण जगाला एकापेक्षा एक सरस फलंदाज दिले. यामध्ये अनुभवी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीपासून विराट कोहलीपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांनी क्रिकेटच्या विश्वात राहून अनेक शानदार खेळी खेळल्या आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
2022 हे वर्ष कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात संस्मरणीय ठरले असेल तरी भारतातील सूर्यकुमार यादव याने या वर्षी T20I मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. वर्षातील शेवटच्या T20 सामन्यात केवळ 13 धावा करणाऱ्या सूर्याने यावर्षी 31 डावांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1,164 धावा केल्या. या काळात त्याने दोन शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहे.
सूर्याने T20 क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत त्याने अनेक पराभूत सामने जिंकले आहेत. त्याने फलंदाजीचा तो धडा रचला, ज्याचे दुसरे उदाहरण सापडणे कठीण आहे. तो मैदानावर येताच वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. फलंदाजी करताना त्याचा स्ट्राईक 187.43 होता.
वाचा : Whatsapp वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, नवीन वर्षात या फोनमध्ये दिसयाचं होणार बंद, पाहा संपूर्ण लिस्ट
T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला 10 गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले असेल. परंतु सूर्यकुमार यादव त्याच्या कामगिरीमुळे भारतासाठी मोठा हिरो ठरला. त्याने विश्वचषकातील 6 सामन्यात तुफानी पद्धतीने 239 धावा केल्या. तो क्रीझवर येताच गोलंदाजांवर हल्ला करायचा. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारले. सूर्याचा खेळ पाहून विराट कोहली म्हणाला की तो, व्हिडिओ गेमसारखा खेळत आहे.
सूर्यकुमार यादव सध्या ICC T20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये त्याने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सूर्याने 2022 मध्ये 31 टी-20 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतकांचा समावेश आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 25 सामन्यात 996 धावा केल्या आहेत.