IND vs ENG, Yashasvi Jaiswal : इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वाल याने धमाकेदार द्विशतक (Yashasvi Jaiswal Double Century) ठोकलं. त्याने 290 चेंडूंत 19 चौकार आणि सात षटकार मारून 209 धावा केल्या. विनोद कांबळी आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर कसोटीत द्विशतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) देशातील तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. द्विशतक झळकावल्यानंतर यशस्वी जयस्वालचं खास सेलिब्रेशन पहायला मिळालं. त्यावेळी त्याने फ्लाईंग किस (Flying Kiss) दिली होती. त्यावर आता खुलासा केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक झळकवल्यानंतर बीसीसीआयने यशस्वी जयस्वालचा एक व्हिडीओ शेअर केलाय. दुसरा दिवस संपल्यानंतर यशस्वीने फोटोशूट केलं. त्यावेळी त्यांने द्विशतकानंतर दिलेल्या फ्लाईंग किसची पुनरावृत्ती केली. त्यावेळी ही फ्लाईंग किस नेमकी कोणासाठी होती? असा सवाल त्याला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला यशस्वी जयस्वाल?
मी सामन्यामध्ये प्रत्येक बॉलचा आनंद लुटला. तो आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते. मी दिलेला फ्लाईंग किस माझ्या चाहत्यांसाठी होता, असं यशस्वी जयस्वाल म्हणतो. यशस्वी भव: म्हणत क्रिकेटच्या देवाने म्हणजेच सचिन तेंडूलकरने जयस्वालला आशीर्वीद दिला होता. त्यावर देखील यशस्वीने भाष्य केलंय. 'सचिन सर, तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी नेहमी प्रयत्न करत राहीन आणि शिकत राहीन', असं जयस्वाल म्हणतो.
दरम्यान, जयस्वालच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघ पहिल्या डावात 396 धावा करु शकला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या डाव्या हाताच्या फलंदाजांनी द्विशतक ठोकणारा यशस्वी पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याआधी सौरव गांगुलीने विरुद्ध पाकिस्तानविरुद्ध, तर गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतकीय खेळी केली आहे.
First reaction post his double ton
Innings No.2 loading today #TeamIndia | #INDvENG | @ybj_19 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pMM3EcPFEW
— BCCI (@BCCI) February 4, 2024
इंग्लंडची प्लेइंग 11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.