WTC - भारतीय गोलंदाजीवर दिग्गज खेळाडूची टीका, ईशांत, शमी आणि बुमराहवर उपस्थित केले प्रश्न

खेळपट्टीचा फायदा उचलण्यात भारतीय गोलंदाज ठरतायत अपयशी?

Updated: Jun 21, 2021, 04:57 PM IST
WTC - भारतीय गोलंदाजीवर दिग्गज खेळाडूची टीका, ईशांत, शमी आणि बुमराहवर उपस्थित केले प्रश्न title=

साउथेम्प्टन : भारत आणि न्यूझीलंडदम्यान सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडनं पहिल्या डावाची दमदार सुरुवात केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना केवळ दोन विकेट घेण्यात यश आलं. आर अश्विन आणि इशांत शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्द शमीला एकही विकेट घेता आली नाही. भारताचे वेगवान गोलंदाज काहीसे थकल्याचं दिसत होते. 

सायमन डोलची भारतीय गोलंदाजांवर टीका
साऊथेम्पटनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अऩुकूल आहे. असं असतानाही जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी बॉल स्विंग करण्यात अपयशी ठरत होते. या उलट न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत भारताला कमी धावसंख्येत रोखलं, अशी टीका न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज सायमन डोल यांनी केली आहे. ईशांत शर्मा व्यतिरिक्त भारतीय संघात एकही स्विंग गोलंदाज नसल्याचंही सायमन डोल यांनी म्हटलं आहे. 

'बुमराह-शमी स्विंग गोलंदाज नाहीत'
मोहम्मद शमी हा स्विग नाही तर मध्यमगती गोलंदाज आहे, तर बुमराही अपेक्षित गोलंदाजी करण्यात अपयशी ठरतोय, असं डोल यांनी म्हटलंय. सामन्याआधी भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांचा सराव कमी पडलाय आणि याचं नुकसान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाला होतंय असं मत सायमन डोल यांनी व्यक्त केलंय.