मुंबई: टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी विकेटकीपर ऋषभ पंतने जडेजाला बॉलिंगचा कानमंत्र दिला. जडेजानं त्याचा वापर करून फलंदाजाला आऊट केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना आता रंगात आला असताना ऋषभ पंतच्या स्टंम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालेल्या आवाजाचा व्हिडीओ चर्चेत आला.
रवींद्र जडेजाला किवीच्या फलंदाजांनी हैराण केलं. टिम साउदीने 46 चेंडूमध्ये 30 धावा केल्या. ज्यामध्ये एक चौकार आणि 2 षटकारही ठोकले. 100 व्या ओव्हर दरम्यान रवींद्र जडेजाच्या एका बॉलवर टिम साउदीनं सिक्स ठोकला. त्याचा बदला घेण्यासाठी ऋषभ पंतने स्टंम्पच्या माइकमधून ऋषभने बॉलिंगचा कानमंत्र दिला.
— pant shirt fc (@pant_fc) June 23, 2021
ऋषभ पंत विकेटकीपिंग करताना म्हणाला, 'जड्डूभाई, जसा बॉल ग्रँडहोमला जसा टाकला तसाच टाकायला पाहिजे शाब्बास' असं म्हणताच जडेजानं पुढचा बॉल असा टाकला की टिम साउदी थेट पुढच्या बॉलवर आऊट झाला. जडेजानं त्याच्या आधीच्या बॉलवर मारलेल्या सिक्सचा बदला आऊट करून घेतला.
ऋषभ पंतने माइक स्टम्पमध्ये बोललेला आवाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. जड्डूभाईनं त्याचा सल्ला ऐकला आणि टिम साउदी आऊट झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया 32 धावांनी आघाडीवर आहे. दुसरा डाव सुरू झाला असून पहिल्या डावात 217 तर दुसऱ्या डावात 64 धावा केल्या आहेत. तर किवी संघाने 249 पहिल्या डावात केल्या आहेत.