मुंबई: आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगने विरुद्ध संघाला घाम फोडणाऱ्या खेळाडूला मात्र ऐनवेळी बाथरूममध्ये जाऊन लापण्याची वेळ का आली असावी? याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. टीम इंडियाच्या छोट्याशा चुकांचा फायदा उचलून किवी संघानं संधी साधली आणि चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली. या चॅम्पियनशिप नंतर किवीचा ऑलराऊंडर खेळाडू काइल जेमिनसनने धक्कादायक खुलासा केला.
टीम इंडियाने केलेल्या स्कोअरचा पाठलाग करताना खूप जास्त दडपण आणि भीती आल्यामुळे काइल जेमिनसनला बाथरूममध्ये लपण्याची वेळ आली होती. अंतिम सामन्यात जेमिनसन ड्रेसिंग रूममधून सामना पाहून घाबरला. त्याच्यावर दडपण आलं. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये हा सर्वात कठीण काळ होता असंही जेमिनसन म्हणाला.
अंतिम सामन्यात जेमिनसननं 7 विकेट्स घेऊन मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावर केलं. किवी संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. चाहते टीम इंडियाच्या प्रत्येक बॉलवर जोरात ओरडत होते. जसं की विकेटच गेली असावी असं वाटत होतं. न्यूझीलंड संघाने टीम इंडियाला 8 विकेट्सने मात देऊन किवी संघ चॅम्पियनशिप बनला.
हा सामना पाहाणं माझ्यासाठी तरी खूप कठीण होतं. मी सतत बाथरूममध्ये जात होतो. तिथे खूप शांतता होती. काय होईल याची घालमेल सुरू होती तर दुसरीकडे खूप जास्त दडपण होतं. हा तणाव घालवण्यासाठी मी बाथरूममध्ये लपल्याचं जेमिनसनने सांगितलं.