अभिमानास्पद! टीम इंडियातील 3 खेळाडूंची अर्जुन तर दोघांची खेलरत्नसाठी शिफारस

अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावांचीही भारतीय मंडळाने शिफारस केली आहे. 

Updated: Jun 30, 2021, 03:15 PM IST
अभिमानास्पद! टीम इंडियातील 3 खेळाडूंची अर्जुन तर दोघांची खेलरत्नसाठी शिफारस title=

मुंबई: क्रिकेटच्या मैदानात आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मान अर्जुन पुरस्कारानं केला जातो. यंदा बीसीसीआयने टीम इंडियातील 5 खेळाडूंची नावं सुचवली आहेत. खेल रत्नपुरस्कारासाठी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज यांच्या नावांची शिफारस केली आहे.

अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावांचीही भारतीय मंडळाने शिफारस केली आहे. शिखर धवन, केएल राहुल आणि बुमराहसाठी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तर मितालीची शिफारस खेलरत्नसाठी करण्यात आली आहे. यावर्षी मितालीला खेलरत्न पुरस्कार मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

मितालीने आयर्लंड विरुद्ध 26 जून 1999 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सचिनची एकदिवसीय कारकिर्द एकूण 22 वर्ष 91 दिवसांची होती. सचिनने पदार्पण आणि अखेरचा सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. सचिनने 18 डिसेंबर 1989 ला वनडे डेब्यू केलं होतं. तर 2012 ला अखेरचा सामना खेळला होता. मिताली वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. 

मिताली राजची ऐतिहासिक कामगिरी, सचिननंतर असा कारनामा करणारी दुसरीच क्रिकेटपटू

जसप्रीत बुमराह आणि अश्विनची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उत्तम आहे. तर सध्या शिखर धवन श्रीलंका दौऱ्यावर असून B टीमचं नेतृत्व त्याच्या खांद्यावर आहे. टीम इंडियाच्या A टीमने चॅम्पियनशिप गमवली. त्यामुळे बरीच टीकाही झाली. आता टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंड सीरिजची तयारी करत आहेत. 

वेगवान बॉलर बुमराहने कसोटी सामने 20 खेळले आहेत. त्यामध्ये 83 विकेट्स घेतल्या तर 67 वन डे सामन्यात 108 विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या आहेत. 50 टी 20 सामन्यात बुमराहने 59 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. 

वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू, पण घडलं असं काही की....

ऑलराऊंडर अश्विननं 79 कसोटी सामने खेळून 2685 धावा केल्या आहेत. तर 413 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. 111 वन डे सामने खेळून 675 धावा आणि 150 विकेट्स आपल्या नावावर केल्या. टी 20 मध्ये 46 सामने खेळून 52 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.