साऊथम्पटन : टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम सामना (ICC World Test Championship Final) साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या दिवसातील अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या सत्राचा खेळ खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) खास कामगिरी केली आहे. विराटने 10 धावा पूर्ण करताच त्याचा स्पेशल क्लबमध्ये समावेश झाला आहे. (wtc final 2021 day 2team india captain virat kohli becomes 6th indian who completed 7 thousand 5 hundres runs in test cricket)
Virat Kohli now has 7500 runs in Test cricket!
He becomes the 42nd Test batsman and the sixth Indian to reach this landmark.
Both he and Sunil Gavaskar have taken 154 innings to reach the 7500-run mark.#INDvsNZ #IndvNZ#WTCFinal #WTC21final #WTC21#WTCFinal2021#WTC— Mohandas Menon (@mohanstatsman) June 19, 2021
विराटने 10 वी धाव पूर्ण करताच त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 7 हजार 500 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराटने ही कामगिरी 92 टेस्ट मॅचमधील 154 डावांमध्ये केली आहे. विराट अशी कामगिरी करणारा सहावा भारतीय तर एकूण 42 वा फलंदाज ठरला आहे. विराटने कसोटी कारकिर्दीत 27 शतक आणि 25 अर्धशतकं लगावली आहेत.
कमी डावात 7500 धावांचा टप्पा गाठणारे भारतीय
सचिन तेंडुलकर - 144 डाव
वीरेंद्र सहवाग - 144 इनिंग्स
राहुल द्रविड - 148 डाव
विराट कोहली - 154 डाव
सुनील गावस्कर - 154 इनिंग्स
सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व
दरम्यान विराटने या महामुकाबल्याच्या टॉससाठी मैदानात पाय ठेवताच कारनामा केला. विराट टीम इंडियाकडून सर्वाधिक सामन्यात कॅप्टन्सी करणारा खेळाडू ठरला. त्याने याबाबतीत महेंद्रसिंह धोनीला पछाडत हा विक्रम आपल्या नावे केला. धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं होतं. तर विराटचा न्यूझीलंड विरुद्धचा हा महामुकाबला कर्णधार म्हणून 61 वा सामना आहे.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय
सचिन तेंडुलकर - 15 हजार 921 धावा
राहुल द्रविड - 13 हजार 265
सुनील गावस्कर - 10 हजार122 धावा
वीवीएल लक्ष्मण - 8 हजार 781 धावा
वीरेंद्र सहवाग - 8 हजार 503 रन्स
विराट कोहली - 7500*
संबंधित बातम्या :
WTC FINAL | वॅग्नरने टाकलेला चेंडू थेट हेल्मेटवर आदळला, पुजारा थोडक्यात बचावला