WTC 2023 Final Date and Time In India: बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final) उद्यापासून म्हणजेच 7 जून 2023 पासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडू मागील काही दिवसांपासून इंग्लडमध्ये या सामन्यासाठी सराव करताना दिसत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मांबरोबर सर्वच फलंदाज आणि गोलंदाजही नेट्समध्ये घाम गाळत असल्याचे फोटो बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. मात्र हा सामना इंग्लंडमध्ये होणार असल्याने तो कुठे कधी आणि भारतीय वेळेनुसार किती वाजल्यापासून लाइव्ह पाहता येणार आहे याबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडा संभ्रम आहे. सामान्यपणे परदेशातील सामन्यांबद्दल हा संभ्रम होतोच. त्यामुळेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम (World Test Championship Final) नेमका किती वाजता लाइव्ह टेलिकास्ट होणार आहे तो कुठे पाहता येईल जाणून घेऊयात...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवला जाणार आहे. हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल दोन स्थांनावर असल्याने ते अंतिम सामना खेळणार आहेत. हा सामना इंग्लंडमधील केनिंग्टन येथे असलेल्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारतामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या लाइव्ह टेलिकास्टचे हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने विकत घेतले आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हा सामाना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरच लाइव्ह पाहता येईल. भारतात या सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमींग स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 तामिळ एसडी प्लस एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 तेलगू होणार आहे. तर ऑनलाइन स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवरुन पाहता येणार आहे.
नक्की पाहा >> इशानबरोबर साराबद्दल बोलताना हसत हसत जमिनीवर पडला शुभमन? 'तो' फोटो चर्चेत
तुम्हाला हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा सामना पाहायचा असेल तर ऑफिस टाइम थोडा अॅडजेस्ट करावा लागणार किंवा प्रवासादरम्यान हा सामना पहावा लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. हा ऐतिहासिक कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळेच हा सामना तुम्हाला थोड्या अॅडजेस्टमेंटसहीतच पहावा लागेल.
रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)
राखीव खेळाडू - सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार
नक्की पाहा हे फोटो >> WTC Final: नव्या जर्सीत एकदम धांसू दिसतेय Team India! संभाव्य Playing 11 चा New Look पाहिला का?
पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ (उप-कर्णधार), स्कॉट बोलॅण्ड, कॅमरन ग्रीन, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, मारनस लाबुस्चगने, एलेक्स केरी (यष्टीरक्षक), जोश हेजलवूड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), नेथन लिऑन, टॉड मर्फी, मिशेल स्टार्क, डेविड वार्नर
राखीव खेळाडू - मिच मार्श, मैथ्यू रेनशॉ