ऋद्धीमान सहानं मोडला धोनीचा रेकॉर्ड

भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. 

Updated: Jan 8, 2018, 06:41 PM IST
ऋद्धीमान सहानं मोडला धोनीचा रेकॉर्ड title=

केप टाऊन : भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. पहिल्या इनिंगमध्ये ६५ रन्सची आघाडी मिळाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिका १३० रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून  मोहम्मद शमी-जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी २ विकेट घेण्यात यश आलं.

एकीकडे भारतीय बॉलर्सच्या कामगिरीचं कौतुक होत असतानाच भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहानं धोनीचं रेकॉर्ड मोडलं आहे. या मॅचमध्ये सहानं तब्बल १० कॅच पकडले आहेत. पहिल्या इनिंगमध्ये ५ आणि दुसऱ्या इनिंगमध्येही ५ कॅच पकडण्यात सहाला यश आलं. सहाच्या आधी एम.एस.धोनीच्या नावावर हा रेकॉर्ड होता. धोनीनं २०१४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये ९ कॅच पकडले होते. 

टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे विकेट कीपर 

खेळाडू कॅच विरुद्ध 
ऋद्धीमान सहा  १० दक्षिण आफ्रिका 
एम.एस.धोनी  ऑस्ट्रेलिया
नयन मोंगिया दक्षिण आफ्रिका
नयन मोंगिया पाकिस्तान
एम.एस.धोनी  ऑस्ट्रेलिया