लाहोर : तब्बल ८ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट परतणार आहे. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड इलेव्हनची टीम १२, १३ आणि १५ सप्टेंबरला तीन टी-20ची सीरिज खेळणार आहेत.
२००९ साली श्रीलंकेच्या टीमवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं गेलं नव्हतं. २०१५ साली झिम्बाब्वेनं वनडे सीरिज खेळली होती.
वर्ल्ड इलेव्हनसोबतच्या या टी-20 सीरिजनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये वेस्ट इंडिजची टीम पाकिस्तानमध्ये टी20 सीरिज खेळणार आहे. वेस्ट इंडिजबरोबरच श्रीलंकेची टीमही पाकिस्तानमध्ये जाऊन खेळणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे.
दरम्यान वर्ल्ड इलेव्हनच्या टीममध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांग्लादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिज या देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. पण एकही भारतीय क्रिकेटपटू या वर्ल्ड इलेव्हनच्या टीममध्ये असणार नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनं भारताचे खेळाडू नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
वर्ल्ड इलेव्हन टीम : फॅप ड्युप्लेसी, हाशीम आमला, जॉर्ज बेली, पॉल कॉलिंगवूड, बेन कटिंग, ग्रॅण्ड एलियट, तमीम इक्बाल, डेव्हिड मिलर, टीम पेन, थिसारा परेरा, डॅरेन सॅमी, सॅम्युयल बद्री, मॉर्ने मॉर्कल, इम्रान ताहीर
पाकिस्तानी टीम : सरफराज अहमद(कॅप्टन), फखर झमान, अहमद शहजाद, बाबर आझम, शोएब मलिक, उमर अमिन, इमाद वसीम, शदाब खान, मोहम्मद नवाझ, फहीम अशरफ, हसन अली, अमीर यमीन, मोहम्मद आमीर, रुमन रईस, उस्मान खान, सोहेल खान