भारताने सेमी-फायलनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे विराट कोहलीने शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं तर दुसरीकडे मोहम्मद शमीने घेतलेल्या 7 विकेट्सच्या आधारे न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 विकेट्स गमावत 397 धावांचा डोंगर उभा केला होता. आव्हानाचा पाठलाद करताना न्यूझीलंड संघ 327 धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान या सामन्यात झालेले वाद आणि रेकॉर्ड्स याबद्दल न्यूझीलंडमधील मीडियातही खूप चर्चा सुरु आहे.
न्यूझीलंडची मीडिया कंपनी स्टफने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, "मुंबईत भारतीय संघाने शेवटच्या क्षणी बदण्यात आलेल्या खेळपट्टीवर पराभव करत फायलनमध्ये प्रवेश केला. पण भारतीय संघ खेळपट्टीच्या वादाने घेरली आहे".
वृत्तात लिहिलं आहे की, "सेमी-फायनल नव्या खेळपट्टीवर खेळली जाणार होती. पण सोमवारी अशा खेळपट्टीवर सामना झाला जी दोन वेळा वापरण्यात आली होती. यानंतर भारतीय संघासाठी खेळपट्टी बदलण्याचा आल्याचा वाद सुरु झाला आहे. आयसीसीच्या देखरेखीखाली स्थानिक मैदान अधिकारी खेळपट्टीची तयारी आणि निवडीचे प्रभारी आहेत".
न्यूझीलंडच्या न्यूज वेबसाईटने खेळपट्टीच्या वादावर आयसीसीने केलेल्या अधिकृत भाष्याचा उल्लेख करत म्हटलं आहे की, "आयसीसीने एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की, संपूर्ण स्पर्धेत खेळपट्टी बदलली जात होती आणि सेमी-फायनलमध्ये जे झालं त्याची आम्हाला माहिती होती. पण सामना सुरु होण्याआधी खेळपट्टी बदलण्यात आल्याने घरगुती संघाला विजयी करण्यासाठी सर्व केल्याचं बोललं जात आहे".
न्यूझीलंडमधील वृत्तपत्र 'द पोस्ट'ने बातमीचं हेडिंग दिलं आहे की, "ब्लॅक कॅप्स लढले, पण हारले कारण भारताचं जबरदस्त यश कायम आहे". डेरिल मिशेल आणि केन विल्यमसनने थोड्या आशा निर्माण केल्या होत्या, पण 71 धावा कमी पडल्या आणि 39 धावांचं मोठं आव्हान पूर्ण करु शकले नाही असं त्यांनी लिहिलं आहे.
खेळपट्टीच्या वादावरही त्यांनी टिप्पणी केली आहे. "सुरुवातीला 20.12 मीटरच्या नव्या खेळपट्टीवर खेळलं जाईल असं ठरलं होतं. पण नंतर सामना त्या खेळपट्टीवर झाला जिथे आधीच 2 सामने झाले होते. 2 नोव्हेंबरला तिथे शेवटचा सामना खेळला गेला होता," असं त्यांनी वृत्तात लिहिलं.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "खेळपट्टी का बदलली आणि त्याचा निर्णय भारताच्या आदेशानुसार झाला का? याची चौकशी झाली पाहिजे. पण आयसीसीने स्पर्धेदरम्यान खेळपट्टी बदलली जात असते आणि त्यांना याची कल्पना होती हे स्पष्ट केलं आहे".
न्यूझीलंडच्या एका वृत्तपत्राने इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनच्या विधानाचा दाखला दिला आहे. "हे फारच वाईट होतं. सेमी-फायलनमध्ये वापर झालेल्या खेळपट्टीवर सामना खेळवण्याची काही गरज नव्हती. भारत फार चांगला संघ आहे आणि त्यांनी खेळपट्टीची चिंता करण्याची गरज आहे".
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "आपण सत्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. आयसीसीला भारतीय संघ फायनलमध्ये पाहायचा आहे. भारत कोणत्याही खेळपट्टीवर न्यूझीलंडचा पराभव करु शकत होतं. कारण भारतीय संघ इतरांच्या तुलनेत चांगला आहे". तसंच न्यूझीलंडमधील वन न्यूजने खेळपट्टीच्या वादावर लिहिलं आहे की, भारतीय संघ या संघात अजय राहिली असून त्यांच्यावर न्यूझीलंडचा पराभव करण्याचा दबाव होता.
दरम्यान न्यूझीलंडमधील मीडियाने विराट कोहली आणि मोहम्मद शमीचं कौतुकही केलं आहे. एका वृत्तपत्राने विराट कोहलीने केलेली खेळी स्वप्नवत होती. त्याने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं करणारा पहिला खेळाडू ठरला आहे असं कौतुक केलं आहे.
तसंच हेराल्ड या वृत्तपत्राने मोहम्मद शमीवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. "दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने 57 धावांवर 7 विकेट घेत न्यूझीलंड संघाला खिंडार पाडलं. सेमी-फायनलमध्ये शमीने जे केलं ते एका शक्तिशाली गोलंदाजाची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.