Mohammed Shami : वर्ल्ड कपमध्ये धमाका करणाऱ्या शमीला अभिनेत्रीकडून लग्नाची ऑफर, पण ठेवली 'ही' अट!

Actress Payal Ghosh On Mohammed Shami : वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) दमदार कामगिरीनंतर आता शमीला लग्नाच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. त्याच्या खासगी आयुष्य़ात वादळ निर्माण झाल्यानंतर आता एका अभिनेत्रीने शमीला लग्नाची ऑफर दिलीये.

सौरभ तळेकर | Updated: Nov 8, 2023, 08:23 PM IST
Mohammed Shami : वर्ल्ड कपमध्ये धमाका करणाऱ्या शमीला अभिनेत्रीकडून लग्नाची ऑफर, पण ठेवली 'ही' अट! title=
Mohammed Shami, World Cup 2023, Payal Ghosh

Mohammed Shami World Cup 2023 : मोहम्मद शमीला वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियामध्ये (Team India) संधी मिळेल का? असा सवाल विचारला जात होता. बुमराह आणि सिराज यांनी टीम इंडियामध्ये जागा कायम ठेवली होती. मात्र, हार्दिक पांड्या जखमी झाल्याने शमीला (Mohammed Shami) संधी मिळाली अन् त्याने संधीचं सोनं केलं. एक दोन नव्हे तर 6 सामने शमीने जिंकवले आहेत. शमीने कोणत्याही खेळाडूला मैदानात टिकूच दिलं नाही. त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शमीची दहशत निर्माण झालीये. कोर्टाने दिलासा दिल्यानंतर शमीला वर्ल्ड कपमध्ये खेळता आलंय. त्यामुळे आता शमी कोणालाही सुट्टी देणार नाही, हे पक्कं झालंय. अशातच आता शमीच्या फॅन फॉलोविंगमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्याचं कारण म्हणजे शमीला आता थेट लग्नाच्या ऑफर येऊ लागल्या आहेत.

खेळाडू मोहम्मद शमी (Mohammad Shami) गेल्या काही दिवसात वैवहिक जीवन देखील खूप चर्चेत राहिलाय. पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) दाखल केलेल्या घरगुती हिंसाचारप्रकरणी कोलकात्याच्या अलीपूर न्यायालयाने शमीचा जामीन मंजूर केला होता.  मोहम्मद शमीने गेल्या 3 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. शमीच्या या कामगिरीवर सर्व क्रिकेट प्रेक्षक खूश असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिने मोहम्मद शमीला लग्नाची ऑफर दिली. 

पायल घोष सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचं दिसून येतं. पायलने आत्तापर्यंत वर्ल्ड कपच्या अनेक सामन्यांवर पोस्ट करत असते. अशातच पायल घोष शमीची कामगिरी पाहिल्यानंतर त्याची फॅन झालीये. तिने एक पोस्ट लिहित शमीला लग्नाची मागणी घातली. शमी तू फक्त इंग्रजी सुधाकर, मी तुझ्यासह लग्न करण्यासाठी तयार आहे, असं पायल घोष हिने म्हटलं आहे.

दरम्यान, शमीने चार सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरोधात 5, इंग्लंडविरोधात 4, श्रीलंकाविरोधात 5 आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता सेमीफायनल सामन्यात भारतीय गोलंदाजांचा टेटर निर्माण झालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.