साऊथम्पटन : वर्ल्ड कप २०१९ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या २२८ रनचं आव्हान टीम इंडियाने ४ विकेट गमावून पूर्ण केलं. रोहित शर्माचं शतक आणि युझवेंद्र चहलने घेतलेल्या ४ विकेटच्या जोरावर टीम इंडियाचा विजय झाला. या मॅचमध्ये धोनीने ३४ रनचं महत्त्वाची खेळी केली आणि एक स्टम्पिंगही केलं. पण या मॅचमध्ये धोनीने घातलेल्या ग्लोव्हजची चर्चा सर्वाधिक सुरु आहे.
धोनीने त्याच्या ग्लोव्हजवर भारतीय लष्कराच्या एका ब्रिगेडचं चिन्ह लावलं होतं. या चिन्हावर बलिदान असं लिहिण्यात आलं होतं. पॅरा स्पेशल फोर्समध्ये काम केलेल्यांनाच 'बलिदान'चं हे चिन्ह वापरण्याची परवानगी असते. धोनीला २०११ मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून गौरवण्यात आलं होतं. धोनीने हे ग्लोव्हज घातल्यामुळे त्याचं सोशल नेटवर्किंगवर कौतुक होत आहे.
Lt. Colonel of Territorial Army man M.S. Dhoni.
On his gloves we can see the #Balidan badge of the Para Special Forces #ParaSF .... The elite special forces of our nation. #ParachuteRegiment #Paratroopers pic.twitter.com/da87RxKPQx
— Krrissh Yadhu (@KrrisshYadhu) June 6, 2019
Salute & respect to MS Dhoni who printed insignia of 'Balidan' on his wicket keeping gloves.
That's the regimental dagger insignia which represents the Para SF, Special Operations unit of Indian Army attached to Parachute Regiment. @msdhoni #BCCI#INDvSA #Dhoni #INDvSA pic.twitter.com/PIriFyBLW0
— Jagdish Dangi (@jagdishjd07) June 6, 2019
If you’d have noticed dhoni’s wicket keeping gloves have the Para logo on it! Legendary levels of swag!@msdhoni @BCCI @ChennaiIPL @ChennaiyinFC @cricketworldcup #INDvSA #legends @IAF_MCC #ArmedForces pic.twitter.com/P3nNI9B6vf
— Vivek Singh (@viveksingh1201) June 6, 2019
Balidan symbol on Dhoni's Wicket Keeping Gloves @msdhoni @ChennaiIPL#MSDhoni #Dhoni #DhoniAtCWC19#CWC19 #INDvSA #TeamIndia #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/d3nevaH2Ff
— Sanjay Msd (@SanjayMsd07) June 5, 2019
सैन्यदलाशी संबंधीत हे चिन्ह पहिल्यांदाच वापरात आणण्याची ही धोनीची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही टोपीपासून ते मोबाईलच्या कव्हरपर्यंत अनेकदा त्याने या चिन्हाला पसंती दिली होती.
MS has a mobile case with Balidan. Also during IPL he was wearing cap with Balidan. His love and respect for Para SF is above all. #Balidan #ParaSF pic.twitter.com/f2C01jnvUB
— Prabhu (@Cricprabhu) June 5, 2019
भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजू होण्याची इच्छा असल्याचं धोनीने अनेकदा सांगितलं होतं. क्रिकेटमध्ये त्याच्या कर्तृत्वाची उंची पाहता भारतीय लष्कराकडून २०११ मध्ये त्याला मानाचं असं लेफ्टनंट कर्नल पद बहाल करण्यात आलं होतं. ज्यानंतर तो 106 Para TA च्या सेवेत होता. मुख्य म्हणजे त्याने पॅरा बेसिक प्रशिक्षणही पूर्ण केलं होतं. शिवाय, पाचवेळा पॅरा जम्प मारत त्याने पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. माहीचा हा एकंदर अंदाज पाहता खरंच क्रीडारसिकांमध्ये असणारा त्याच्याविषयीचा आदर वाढला असणार यात वाद नाही.