World Cup 2019 : रोहित शर्माचं झुंजार शतक, टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी

वर्ल्ड कप २०१९मध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. 

Updated: Jun 5, 2019, 10:46 PM IST
World Cup 2019 : रोहित शर्माचं झुंजार शतक, टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी title=

साऊथम्पटन : वर्ल्ड कप २०१९मध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये भारताला विजयासाठी २२८ रनची गरज आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

LIVE UPDATE

रोहित शर्माच्या झुंजार शतकामुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. 

भारताला चौथा धक्का, रोहितसोबतच्या चांगल्या पार्टनरशीपनंतर धोनी आऊट

रोहित शर्माचं झुंजार शतक, टीम इंडियाचा डाव सावरला

टीम इंडियाला तिसरा धक्का, केएल राहुल २६ रनवर आऊट

रोहित शर्माचं संघर्षमय अर्धशतक, ७० बॉलमध्ये ५० रनची खेळी

टीम इंडियाला दुसरा धक्का, कर्णधार विराट कोहली 18 रनवर आऊट

२२८ रनचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिला धक्का, शिखर धवन ८ रनवर आऊट

World Cup 2019 : टीम इंडियाला विजयासाठी २२८ रनचे आव्हान  

दक्षिण आफ्रिकेची आठवी विकेट, क्रिस मॉरिस ४२ रनवर आऊट

 दक्षिण आफ्रिकेला सातवा झटका, आदिले फेहलुकवायो  माघारी 

 दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का, चहलने घेतली मिलरची विकेट

दक्षिण आफ्रिकेची पाचवी विकेट, कुलदीपच्या बॉलिंगवर ड्युमिनी एलबीडब्ल्यू

युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेला एकाच ओव्हरमध्ये दुसरा धक्का दिला, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डुप्लेसिस ३८ रनवर आऊट

युझवेंद्र चहलचा दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, व्हॅन डर डुसेन २२ रनवर आऊट

बुमराहचा दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, क्विंटन डिकॉक १० रनवर आऊट

 जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. स्कोअरबोर्डवर ११ रन असताना आफ्रिकेची पहिली विकेट पडली. हाशिम आमला ६ रन करून आऊट झाला. बुमराहची ही वर्ल्ड कपमधली पहिली विकेट आहे.

 

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारताने कुलदीप आणि चहलला संधी दिली आहे.

वर्ल्ड कपमधली पहिलीच मॅच असल्यामुळे टीम इंडिया चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत ज्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पहिली मॅच जिंकली आहे, तेव्हा त्यांची वर्ल्ड कपमधली कामगिरी समाधानकारक राहिली आहे. १९८३ आणि २०११ चा वर्ल्ड कप भारताने जिंकला, त्यावेळीही पहिल्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता.

भारतीय टीम

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर, चहल, कुलदीप, बुमराह

दक्षिण आफ्रिकेची टीम 

क्विंटन डिकॉक, हाशिम आमला, फॅफ डुप्लेसिस, रसी वॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, एन्डिल पेहलुक्वायो, क्रिस मॉरिस, कगिसो रबाडा, इम्रान ताहिर, तबरेझ शमसी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये ४ मॅच झाल्या आहेत. यातल्या ३ मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा आणि एका मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. १९९२, १९९९ आणि २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला, तर २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला.