स्वप्न भंगलं! जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पराभव

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. 

Updated: Aug 27, 2017, 09:54 PM IST
स्वप्न भंगलं! जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पराभव title=

ग्लॅस्गो : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.  स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या स्पर्धेत सिंधूचा अंतिम सामन्यात जपानच्या नोझुमी ओकुहाराने २१-१९, २०-२२, २२-२० ने पराभव केला.

जपानच्या नोझोमी ओकुहाराने उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि अंतिम फेरीत सिंधूचं आव्हान मोडीत काढून महिला एकेरीच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या ऑलिम्पिक रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेतही अखेर रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. 

नोझोमी ओकुहाराने सिंधूवर 21-19, 20-22, 22-20 अशी मात केली. 2013 आणि 2014 सालच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.

2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती महिला एकेरीच्या रौप्यपदकाची मानकरी ठरली होती. ग्लॅस्गोतल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं सुवर्णपदक जिंकण्याचा सिंधूचा प्रयत्न असफल ठरला.