पत्रकाराच्या प्रश्नावर निशब्द झाला Virat kohli, दिलं असं रिएक्शन की...

त्याचे चाहते आता 71 व्या शतकाची गेल्या 2 वर्षांपासून वाट पाहतायत.

Updated: Aug 12, 2022, 08:56 AM IST
पत्रकाराच्या प्रश्नावर निशब्द झाला Virat kohli, दिलं असं रिएक्शन की... title=

मुंबई : सध्याच्या घडीला विराट कोहली एक उत्तम क्रिकेटर्सपैकी एक मानला जातो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोहलीने आतापर्यंत 70 शतकं ठोकली असून त्याचे चाहते आता 71 व्या शतकाची गेल्या 2 वर्षांपासून वाट पाहतायत. ज्याप्रमाणे फुटबॉलमध्ये लिओनेल मेस्सीला G.O.A.T. म्हटलं जातं. तसंच क्रिकेटमध्ये विराटलाही असं संबोधलं जातं. 

विराट कोहलीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान एका पत्रकाराने विचारलं की, तुला सर्वजण GOAT का म्हणतात? यानंतर त्याने उत्तर देण्याऐवजी स्माईल देणं योग्य मानलं. त्याची प्रतिक्रिया पाहून त्याचे चाहते खूप खूश झाले. त्याचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

GOAT चा अर्थ आहे की, सर्वोत्कृष्ट किंवा महान खेळाडू.  Greatest of All Time असं याचा पूर्ण अर्थ आहे.

कोहली सध्या आऊट फॉर्म

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीची बॅट फार शांत आहे. सध्या तो त्याच्या करियरच्या फार वाईट फॉर्ममधून जातोय. यंदाच्या आयपीएलमध्येही तो खास अशी काही कामगिरी करू शकला नाहीये. इतकंच नाही तर इंग्लंड दौऱ्यावरही तो फ्लॉप ठरला आहे. 

वेस्ट इंडिज दौऱ्यावर विश्रांती घेतल्यानंतर त्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता कोहली आशिया चषक 2022 मध्ये कमबॅक करताना दिसू शकतो. यावेळीही विराट कोहली 71 वं शतक झळकावणार का याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.