धोनी जेव्हा गेलची नक्कल करतो, व्हिडिओ होतोय व्हायरल

धोनीची नक्कल पाहून गेलला हा हसू सूटलं

Updated: Oct 6, 2020, 07:21 PM IST
धोनी जेव्हा गेलची नक्कल करतो, व्हिडिओ होतोय व्हायरल title=
(फोटो-BCCI/IPL)

IPL 2020 : चेन्नई सुपरकिंग्सने 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात पंजाबचा 10 विकेटने मोठा पराभव केला होता. फाफ डु प्लेसी आणि शेन वॉट्सनने रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप करत बंगळुरुला विजय मिळवून दिला होता. त्यांच्या अर्धशतकीय खेळीमुळे चेन्नईने 10 विकेटने विजय मिळवला होता. सामना संपल्यानंतर सीएसकेचा कर्णधार धोनीने 'यूनिवर्स बॉस' क्रिस गेलची नक्कल केली होती. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हात मिळवत होते. त्या दरम्यान धोनीच्या समोर जेव्हा गेल आला तेव्हा त्याने त्याची चालायची अॅक्शन केली.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चर्चेत आहे. धोनी आणि क्रिस गेल यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. धोनीची अॅक्शन पाहून गेलला देखील हसू आवरत नाही. 

सीएसकेने लागोपाठ 3 सामन्यांमध्ये पराभवानंतर पंजाब विरुद्ध विजय मिळवला आहे. पंजाबने आधी बॅटींग करत चेन्नई समोर 178 रनचं टार्गेट ठेवलं होतं. चेन्नईने 17.1 ओव्हरमध्येच लक्ष्य गाठलं. चेन्नईचा पुढचा सामना 7 ऑक्टोबर रोजी कोलकाता विरुद्ध अबुधाबी येथे होणार आहे.

प्वाइंट्स टेबलनुसार चेन्नई सध्या सहाव्या स्थानावर आहे. पंजाबने आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये फक्त 1 सामना जिंकला आहे. तर चेन्नईने 2 सामने आतापर्यंत जिंकले आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x