IND vs AFG: 11 जानेवारी म्हणजे गुरुवारपासून अफगाणिस्तान विरूद्ध भारत ( IND vs AFG ) यांच्यामध्ये टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे. या सिरीजसाठी अफगाणिस्तानची टीम भारताच्या दौऱ्यावर आली आहे. 3 सामन्यांची ही सिरीज असून पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली ही सिरीज खेळवली जाणार असल्याने याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारत आणि अफगाणिस्तान ( IND vs AFG ) यांच्यातील टी-20 सिरीजमधील पहिला सामना गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. यावेळी टॉस सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 6.30 वाजता होणार आहे. इब्राहिम झद्रानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा टीम भारताविरूद्ध ( IND vs AFG ) मोहालीच्या मैदानात उतरणार आहे.
तब्बल एका वर्षाने रोहित शर्मा ( Rohit Sharma ) टी-20 फॉर्मेटमध्ये कमबॅक करत असल्याने चाहते मात्र उत्सुक आहेत. अशातच चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, हा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्याचे स्पोर्ट्स 18 चॅनेलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. हा सामना जिओ सिनेमा अॅपवर देखील स्ट्रीम केला जाणार आहे. चाहते अॅपवर अगदी फ्री या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.
इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलिखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार