IND vs PAK Asia Cup 2023: आशिया कप 2023 ला सुरुवात झाली असून प्रत्येकाचं लक्ष्य 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे. मात्र श्रीलंकेत रंगणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना रद्द होणार की काय अशी भीती आता चाहत्यांच्या मनात आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता खेळला जाणार असून पावसामुळे हा महान सामना खेळला गेला नाही, तर काय होईल हे जाणून घेऊया
Accu Weather च्या अहवालानुसार, शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. या ठिकाणी 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशातच जर पावसामुळे हा सामना रंगला नाही तर दोन्ही टीम्समध्ये 2-2 अंक वाटून दिले जाणार आहे. कारण या सामन्यासाठी कोणताही रिझर्व-डे ठेवण्यात आलेला नाही.
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाने आतापर्यंत 3 वनडे सामने खेळलेत. यामध्ये तिन्ही वनडे सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर भारत आणि पाकिस्तान या मैदानावर पहिल्यांदाच भिडणार आहेत.
याशिवाय पाकिस्तान टीमने पल्लेकेलेमध्ये आतापर्यंत 5 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये पाकिस्तान टीमचा रेकॉर्ड काहीसा खास नाही. यामध्ये पाकिस्तानने 2 सामने जिंकले असून 3 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा
स्टँडबाय खेळाडू: संजू सॅमसन
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहीर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.