लीड्स : इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीमध्ये हरवून वेस्ट इंडिजनं इतिहास घडवला आहे. शाय होप आणि क्रेग ब्रॅथवेट यांच्या शानदार कामगिरीमुळे वेस्ट इंडिजनं इंग्लंडचा ५ विकेटनं पराभव केला आहे. होपनं या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावलं तर क्रेग ब्रॅथवेटनं पहिल्या इनिंगमध्ये १३४ रन्स तर दुसऱ्या इनिंगमध्ये ९५ रन्स बनवले. ३२२ रन्सचा पाठलगा वेस्ट इंडिजनं केला.
तब्बल १७ वर्षानंतर वेस्ट इंडिजनं इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच जिंकली आहे. याआधी १९८४मध्ये क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजनं इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच जिंकली होती.
पहिली टेस्ट मॅच फक्त तीन दिवसांमध्येच इंग्लंडला विजय मिळाला होता. पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा २०९ रन्सनं विजय झाला होता. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये बेन स्टोक्सच्या शतकाच्या मदतीनं इंग्लंडनं २५८ रन्स बनवल्या. यानंतर बॅटिंगला आलेल्या वेस्ट इंडिजनं ब्रेथवेट आणि होपच्या शतकाच्या जोरावर ४२७ रन्स बनवले.
दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आलेल्या इंग्लंडनं ४९० रन्सचा स्कोअर करून वेस्ट इंडिजपुढे ३२२ रन्सचं आव्हान ठेवलं. पहिल्या इनिंगप्रमाणेच यावेळीही होप आणि ब्रेथवेटनं शतक करून वेस्ट इंडिजला जिंकवलं. ३ टेस्ट मॅचची ही सीरिज आता १-१नं बरोबरीमध्ये आली आहे. तिसरी टेस्ट मॅच लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे.