लॉर्ड्स : महिला क्रिकेट टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (England Women vs India Women, 3rd Odi) 16 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडला 3-0 अशा फरकाने क्लीन स्वीप दिला आहे. इंग्लंडसमोर विजयासाठी 50 ओव्हर्समध्ये 170 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 43.3 ओव्हरमध्येच 153 धावांवर रोखलं. (weng vs wind 3rd odi team india beat england by 16 runs and clean sweep jhulan goswami retire at lords cricket ground)
इंग्लंडकडून शार्लोट डीनने सर्वाधिक 47 रन्स केल्या. तर एमी जोन्सने 28 रन्सचं योगदान दिलं. तर एम्मा लांबने 21 धावा जोडल्या. या तिघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही.
A run out at the non-striker's end and India win!#ENGvIND | #IWC | Scorecard: https://t.co/PAduT7xxtc pic.twitter.com/2hKYUjb0YR
— ICC (@ICC) September 24, 2022
रेणूक सिंहने टीम इंडियाकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाड आणि झुलन गोस्वामीने प्रत्येकी 2 खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर दीप्ती शर्माने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
झुलनचा हा अखेरचा सामना होता. टीम इंडियाने हा सामना जिंकत झूलनला विजयी निरोप दिला आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार, दयालन हेमलता, झुलन गोस्वामी, रेणुका सिंग आणि राजेश्वरी गायकवाड.