Virat Kohli Dance: आग लगे बस्ती में, कोहली अपनी मस्ती में.., विराटचा मजेशीर Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!

Virat Kohli Dance Video: विराट कोहलीने शेवटचा पोतारा फिरवत टीम इंडियाला 400 पार केलं. अशातच आता विराट कोहलीचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसून येतंय.

Updated: Jul 15, 2023, 09:58 PM IST
Virat Kohli Dance: आग लगे बस्ती में, कोहली अपनी मस्ती में.., विराटचा मजेशीर Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल! title=
Virat Kohli Dance Video

Virat Kohli Viral Dance Video: भारत विरूद्ध वेस्टइंडीज (IND vs WI 1st Test) यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकाच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 150 धावांवर गारद केल्यानंतर टीम इंडियाच्या सलामीवीरांनी खणखणीत शतक ठोकलं. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal Century) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma Century) शतकाने टीम इंडिया मजबूत स्थितीत आली. त्यानंतर विराट कोहलीने शेवटचा पोतारा फिरवत टीम इंडियाला 400 पार केलं. अशातच आता विराट कोहलीचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसून येतंय.

विराट कोहली 76 धावा करून बाद झाला. कोहलीने शतक झळकावण्याची संधी गमावली. मात्र, त्याचं दु:ख मनात धरून बसेल तो विराट कोहली कसला! विराटने फिल्डिंग दरम्यान सर्वांची मन जिंकली. त्याचाच व्हिडिओ सध्या ट्रेंडिगमध्ये आहे. नेहमीप्रमाणे मैदानावर आपल्या स्टाईलने चाहत्यांचे मनोरंजन करण्याची संधी कोहलीने सोडली नाही. कोहलीची ही शैली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. विराट सामन्यावेळी नाचताना दिसून आलाय.

पाहा Video

कधी डीआरएस घेतानास खदकन हसताना दिसतोय तर कधी भर मैदानात झोपण्याची नाटकी करताना दिसतोय. तर कधी पंजाबी गाण्यावर ठुमके... एन्जॉयच्या बाबतीत विराटचा नाद नाही.  याआधी शुभमन गिलचा डान्स करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता विराटचा डान्स (Virat Kohli Viral Dance Video) चर्चेत आहे.

आणखी वाचा - IND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!

दरम्यान,  पदार्पणातच यशस्वी जयस्वालने यशस्वी सुरूवात करत 171 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 103 आणि विराट कोहलीने 76 धावांची खेळी केली. तर पहिल्या डावात 5 विकेट आणि दुसऱ्या डावात 7 विकेट घेतल्या. त्यामुळे पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य प्लेईंग इलेव्हन (IND vs WI 2nd Test)

भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (WK), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज (Playing XI): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (WK), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.