MS Dhoni: रांचीच्या रस्त्यावर धोनीचा स्वॅग, Rolls Royce फिरवतानाचा Video व्हायरल!

MS Dhoni Viral Video: माही आता रांचीच्या रस्त्यावर गाड्या पळवताना दिसतोय. अशातच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धोनी रांचीच्या रस्त्यावर रोल्स रॉयसमध्ये (Rolls Royce) प्रवास करताना दिसतोय.

Updated: Jul 26, 2023, 04:13 PM IST
MS Dhoni: रांचीच्या रस्त्यावर धोनीचा स्वॅग, Rolls Royce फिरवतानाचा Video व्हायरल! title=
MS Dhoni Viral Video

MS Dhoni Driving Luxury Car: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याच्या आलिशान गाड्यांमुळे चर्चेत असतो. निवृत्तीनंतर धोनी आता आपल्या कुटुंबासह क्वालिटी टाईम घालवताना दिसतोय. तर कधी आपल्या आवडीच्या गाड्या पळवताना दिसतो. काही दिवसांपूर्वी व्यंकटेश प्रसादने (Venkatesh Prasad) धोनीच्या तळघरातील गाड्यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओची (Viral Video) जोरदार चर्चा झाल्याचं दिसून आलं. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. 

नुकताच जीमच्या बाहेर दिसलेला माही आता रांचीच्या रस्त्यावर गाड्या पळवताना दिसतोय. अशातच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धोनी रांचीच्या रस्त्यावर रोल्स रॉयसमध्ये (Rolls Royce) प्रवास करताना दिसतोय. काही चाहत्यांना धोनी रस्त्यावर गाडी चालवताना दिसला. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. धोनीकडे विंटेजपासून ते लक्झरीपर्यंत गाड्यांची श्रेणी आहे. मात्र, रस्त्यावर रोल्स रॉयस घेवून आल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by subodh singh Kushwaha (@kushmahi7)

सध्या ट्रेंडिगमध्ये असलेल्या या व्हिडीओमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या बाजूला त्याची मुलगी झिवा बसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, झिवाचा चेहरा या व्हिडीओमध्ये दिसत नाही. धोनीकडे कार आणि बाईक्सचे अप्रतिम कलेक्शन आहे. व्यंकटेश प्रसाद धोनीचे बाईक कलेक्शन पाहून आश्चर्यचकित झाला होता. मी एका व्यक्तीमध्ये पाहिलेली सर्वात विलक्षण आवड आहे, असं प्रसाद त्यावेळी म्हणाला होता. 

आणखी वाचा - क्रिकेटर युवराज सिंहच्या आईला धमकी; '40 लाख द्या नाहीतर...'

दरम्यान, धोनीकडे 50 पेक्षा जास्त बाइक आहेत, ज्यात Harley-Davidson Fat Boy, Kawasaki Ninja H2, Ducati 1098, Yamaha RD350 आणि Suzuki Hayabusa यांचा समावेश आहे. मला गाड्यांचं जरा वेड आहे. बाइक्स तक्रार करत नाहीत. तुम्ही त्यांना व्यवस्थित ठेवत नाही, तुम्ही त्यांना स्वच्छ करत नाही, तरीही चालतं, असं धोनी एका मुलाखतीत म्हटला होता. त्यानंतर अनेकदा धोनी रांचीच्या रस्त्यावर फिरताना दिसला होता.