Yusuf Pathan On Irfan Pathan: झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जात असलेल्या Zim Afro T10 2023 मध्ये पहिल्या सामन्यात हरारे हरिकेन्सने पहिला विजय नोंदवला आहे. या सामन्यात चमकला तो टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan). रेगिस चकाबवा आणि इरफान पठाण यांच्या शानदार खेळीच्या जोरावर रविवारी झालेल्या सामन्यात हरारे हरिकेन्स (Harare Hurricanes) संघाने डरबन कलंदर्सचा (Durban Qalandars) 5 गडी राखून पराभव केलाय. डर्बनच्या 10 ओव्हरमध्ये केलेल्या 126 धावांच्या प्रत्युत्तरात हरारेने 2 चेंडू राखून सामना खिश्यात घातला.
हरारे हरिकेन्स विरुद्ध डरबन कलंदर्स यांच्यातील सामन्यात इरफान पठाणने 14 चेंडूंचा सामना करत 37 धावा केल्या, ज्यात त्याने 2 चौकार आणि 4 सिक्स देखील लगावले. मात्र, इरफान पठाणला लिंडेने 5 व्या षटकात बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इरफान पठाणने आपलं काम चोखपणे पुर्ण केलं होतं. इरफानची ही आशितबाजी पाहून मोठा भाऊ युसुफ देखील खुश झाला. त्याचा हा आनंद सामन्यावेळी दिसून आला. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सामन्यात इरफानने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना नाचण्यास भाग पाडलं. इरफानची फलंदाजी पाहून त्याचा थोरला भाऊ युसूफ पठाणने ट्विट करून धाकट्या भावाचं कौतुक केलंय. इरफानच्या फलंदाजीवर युसुफने उभं राहुन टाळ्या वाजवल्या होत्या. त्याचा फोटो इरफानने ट्विट केला.
Irfan Pathan hitting sixes & his brother Yusuf Pathan clapping for him #Ashes23 #INDvWI#INDvPAK #INDvsPAKpic.twitter.com/ZVuWeJLDX7
— Abdullah Neaz (@Abdullah__Neaz) July 23, 2023
जेव्हा धाकटा चांगला खेळतो तेव्हा थोरल्याला नेहमी आनंदी असतो जरी तो दुसऱ्या बाजूला असला तरीही, असं म्हणत इरफानने युसुफच्या कृतीचं कौतुक केलंय. इरफानच्या या ट्विटला युसुफने रिट्विट करत उत्तर दिलं. शाब्बास भावा, आज तू चांगली बॅटिंग केलीस, मज्जा आली, तुम्ही चांगला विजय मिळवलात. तुझी खेळी आणि जिंकण्यात फरक होता, असं युसुफ म्हणतो.
Well done! Good hitting, mere bhai. Maja aa gaya, and good win. Your inning was the difference in winning. @IrfanPathan https://t.co/DvFXuFV6O2
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) July 23, 2023
दरम्यान, इरफान या स्पर्धेत हरारे हरिकेन्स संघाकडून खेळत आहे, तर दुसरीकडे त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण जोबर्ग बफेलोज संघाचा भाग आहे.