T20 World Cup 2022 : "भारताचा 'हा' खेळाडू म्हणजे T-20 फॉरमॅटचं भविष्य"

T20 World Cup 2022 पूर्वी पाकिस्तानचा दिग्गज खेळाडूने केली मोठी भविष्यवाणी...

Updated: Oct 12, 2022, 01:09 AM IST
T20 World Cup 2022 : "भारताचा 'हा' खेळाडू म्हणजे T-20 फॉरमॅटचं भविष्य" title=

Wasim Akram : आगामी T20 World Cup 2022 ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात (Australia) खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील, त्यापैकी 8 आधीच सुपर 12 टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. पात्रता फेरीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे इतर 4 संघ त्यांच्याशी सामील होतील. भारतीय संघ सुपर 8 मध्ये आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार मानला जात असतानाच आता पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसिम अक्रमने (Wasim Akram) मोठं वक्तव्य केलंय. (Wasim Akram said suryakumar yadav is future of T20 cricket).

T20 World Cup 2022 पूर्वी वसिम अक्रमने भारताचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केलंय. त्यावेळी सुर्यकुमार त्याचा फेवरेट खेळाडू असल्याचं देखील त्याने म्हटलं आहे. सुर्यकुमार यादव टी-20 फॉरमॅटचं भविष्य असल्याचं देखील वसिम अक्रमने म्हटलंय.

नेमकं काय म्हणाला वसिम अक्रम -

"तो एक अतिशय धोकादायक खेळाडू आहे, तो 360 खेळाडू आहे. तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. मी त्याच्यासोबत दोन वर्षे घालवली होती. त्यावेळी तो फक्त 19 किंवा 20 वर्षाचा होता. मला वाटतं की सुर्यकुमार टी-20 फॉरमॅटचं भविष्य आहे. तो या फॉरमॅटमधील माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे.", असं वसीम अक्रम भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवचं कौतूक करत म्हणाला.

दरम्यान, T20 फॉरमॅट गोलंदाजांसाठी नाही, परंतु वेगवान आणि उसळत्या विकेट्समुळे वेगवान गोलंदाजांना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी T20 विश्वचषकात खेळात ठेवता येईल. वेग हेच ऑस्ट्रेलियात गोलंदाजांच्या यशाची गुरुकिल्ली असेल, असा विश्वास पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने व्यक्त केला आहे.