मुंबई : मोहालीमध्ये भारत विरूद्ध श्रीलंकेच्या सामन्यात दुसऱ्या वनडे मॅचमध्ये फिरकी गोलंदाज वॉशिंगटन सुंदरने डेब्यू केलं.
सुंदरला टीममध्ये चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी सहभागी करून घेतले आहे. टीम इंडियामध्ये सहभागी होताच वॉशिंगटन सुंदरने एक रेकॉर्ड आपल्या नावे करून घेतला आहे. यासोबतच भारतकडून सगळ्यात कमी वयात डेब्यू करणारा हा देशाचा सातवा खेळाडू ठरला आहे.
भारताकडून सगळ्यात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने १६ व्या वर्षी २३८ दिवसाच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं आहे. आयपीएलमध्ये कमाल दाखवलेल्या सुंदरने आता आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये देखील आपली जादू दाखवायला सुरूवात केली आहे. मात्र त्याची एक गोष्ट आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करू शकते.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की सुंदर फक्त एकाच कानाने ऐकू शकतात. त्याला हा त्रास लहानपणापासून होता. हा क्रिकेटर जेव्हा फक्त ४ वर्षाचा होता तेव्हा त्याला हा त्रास होत असल्याचं कळलं. त्याची आई त्याला अनेक डॉक्टरांकडे घेऊन गेले मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.
सुंदरला अनेकदा कानाचा त्रासामुळे त्याला भरपूर सामना करावा लागला आहे. मात्र त्याचा हा त्रास कधीच त्याला अडथळा वाटला नाही. सुंदरने आपल्या मेहनतीच्या जोरावर २०१६ मध्ये तामिळनाडूच्या रणजी क्रिकेट टीममध्ये जागा मिळाली. त्यानंतर एका वर्षानंतरच आयपीएलमध्ये सिलेक्ट झाला. सुंदरला आयपीएलमध्ये रायजिंग पुणे सुपरजाएंट्सतर्फे खेळण्याची संधी मिळाली.
सर्वात कमी वयात डेब्यू करण्याचा रेकॉर्ड आतापर्यंत सचिन तेंडुलकरच्या नावे होता. १६ वर्ष २३८ दिवसांचा असताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. तर दुसऱ्या नंबरवर मनिंदर सिंह आहे. त्याने १७ वर्ष २२२ दिवसांमध्ये डेब्यू केलं होतं. यानंतर आता हरभजन सिंह येतो. भज्जीने १७ वर्ष २८८ दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात केली. यानंतर पार्थिव पटेल १७ वर्ष ३०१ दिवस, लक्ष्मी शुक्ला १७ वर्ष ३२० दिवस, चेतन शर्मा १७ वर्ष ३३८ दिवस तर सुंदर सर्वात कमी वयाच डेब्यू केला आहे. सुंदर वनडे क्रिकेट खेळणारा भारतातील २२० वा खेळाडू आहे.