VIDEO : आज पुन्हा एकदा हैप्पी बर्थडे सचिन ने दुमदुमणार वानखेडे

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. 

Updated: Apr 24, 2018, 09:48 AM IST
VIDEO : आज पुन्हा एकदा हैप्पी बर्थडे सचिन ने दुमदुमणार वानखेडे title=

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४३५७ धावा केल्या. त्याच्या नावावर कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्डही आहे. त्याने वनडेत १८४२६ आणि कसोटीत १५९२१ धावा केल्यात. २४ एप्रिल १९७३मध्ये एक वाजता मुंबईत सचिनचा जन्म झाला. 

१६ वर्षाच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य़े पदार्पण करणाऱ्या सचिनच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सचिनने आपल्या कारकिर्दीत विविध विक्रमांना गवसणी घातली. सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवसही आहे आणि त्यातच आयपीएलचा फिव्हरही चांहत्यांमध्ये आहे. आज मुंबईचा वानखेडेवर हैदराबाद विरुद्ध सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडियम हे सचिनचे होमग्राऊंड आहे. यातच आज सचिन सामन्याला उपस्थित असल्याने पुन्हा एकदा होमग्राऊंडवर हॅपी बर्थडे सचिन असा आवाज घुमणार. 

गेल्या वर्षीही याच दिवशी मुंबईचा सामना वानखेडेवर होता. सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास केकही मागवण्यात आला होता. सचिनने केक कापल्यानंतर संपूर्ण स्टेडियम हॅपी बर्थडे सचिन या आवाजाने दुमदुमले होते. 

गेल्या वर्षी सचिनचा बर्थडे या अंदाजात साजरा करण्यात आला. 

सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियममध्ये केक कापला होता. 

आयपीएलच्या फेसबुक पेजनेही सचिनच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला होता.