सेहवाग म्हणतो; 'मला निवड समिती सदस्य व्हायचंय'

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या हटके ट्विटसाठी ओळखला जातो.

Updated: Aug 12, 2019, 11:40 PM IST
सेहवाग म्हणतो; 'मला निवड समिती सदस्य व्हायचंय' title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या हटके ट्विटसाठी ओळखला जातो. यावेळीही सेहवागने ट्विटरवर अशीच मागणी केली आहे. मला टीम इंडियाच्या निवड समितीचं सदस्य व्हायचं आहे. मला कोण संधी देईल? असं ट्विट सेहवागने केलं आहे.

सेहवागने केलेल्या या ट्विटला मजेदार उत्तरं आली आहेत. 'तुम्ही निवड समिती सदस्य बनण्याच्या लायक नाही, कारण तुमची कामगिरी खूप चांगली आहे. निवड समिती सदस्याला कमजोर कामगिरी करावी लागते.' अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.

तुमच्याकडे 3D क्वालिटी आहे, का असा प्रश्नही एका फॅनने सेहवागला विचारला. वर्ल्ड कपदरम्यान विजय शंकरबद्दल केलेल्या 3D वक्तव्यामुळे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद चर्चेत आले होते. अंबाती रायुडूनेही 3D वर निशाणा साधणारं ट्विट केलं होतं. वर्ल्ड कप पाहण्यासाठी मी थ्रीडी चष्मा ऑर्डर केल्याचं ट्विट रायुडूने केलं होतं.

'पहिले प्रशिक्षक बन मग खेळाडूंची निवड सहज करता येईल,' अशी प्रतिक्रियाही एका यूजरने सेहवागला दिली.