हैदाराबादमध्ये आमिरने दिलेल्या चॅलेन्जमध्ये सेहवाग फेल

अभिनेता आमिर खान आणि दंगल फेम झायरा वसीम शुक्रवारी ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या प्रमोशनसाठी हैदराबादच्या ग्राऊंडवर पोहोचले.

Updated: Oct 13, 2017, 08:44 PM IST
हैदाराबादमध्ये आमिरने दिलेल्या चॅलेन्जमध्ये सेहवाग फेल title=
Image Credit inuth.com

हैदराबाद : अभिनेता आमिर खान आणि दंगल फेम झायरा वसीम शुक्रवारी ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या प्रमोशनसाठी हैदराबादच्या ग्राऊंडवर पोहोचले.

इथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान आमिरने वीरेंद्र सेहवागला एक चॅलेन्ज दिलं. पण विरू ते पूर्ण करू शकला नाही. 

आमिरने सेहवागला विचारले की, ‘रंग दे बसंती’ सिनेमात त्याच्या भूमिकेचे नाव काय होते? या प्रश्नामुळे हैराण झालेला सेहवाग इकडे तिकडे बघताना दिसला. त्याला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्याआधी सेहवागने आमिरला एक प्रश्न विचारला होता. त्याने विचारले होते की, जेव्हा त्याने तिहेरी शतक केले होते. तेव्हा किती बॉल्सचा सामना केला होता. सेहवागने चार ऑप्शन दिले होते. पण आमिरही त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देऊ शकला नाही. 

त्यानंतर आमिरने सेहवागला आणखी एक प्रश्न केला. यावेळी त्याने विचारले की, ‘पीके’ सिनेमातील पीके हा कोणत्या गोळ्यावरून आला होता. सेहवाग जोरात हसायला लागला. तेव्हा आमिरनेच उत्तर देत सांगितले की, सिनेमात त्या गोळ्याचं नावंच सांगितलं नव्हतं.