पाकिस्तान, इंग्लंड की भारत? विरेंद्र सेहवाग म्हणतो 'ही' टीम जिंकणार

वीरेंद्र सेहवागने आता कोणती टीम यंदाच्या टी-20 वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावणार आहे, याचा अंदाज वर्तवला आहे.

Updated: Oct 28, 2021, 08:21 AM IST
पाकिस्तान, इंग्लंड की भारत? विरेंद्र सेहवाग म्हणतो 'ही' टीम जिंकणार title=

मुंबई : T-20 वर्ल्डकप 2021 आता अतिशय रोमांचक वळणावर सुरु आहे. या स्पर्धेच्या सुपर 12 लीगमध्ये प्रत्येक संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताला आता न्यूझीलंडविरुद्धही विजय आवश्यक आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आता कोणती टीम यंदाच्या टी-20 वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावणार आहे, याचा अंदाज वर्तवला आहे.

सोशल मीडियावर एका चाहत्याने त्याला विचारलं की, या वर्षी कोणती टीम T-20 वर्ल्डकप जिंकणार? ज्याचं उत्तर एक शोच्या एपिसोडमध्ये देताना सेहवागने वेळ न घालवता भारताचे नाव घेतलं. तो म्हणाला, 'माझ्या मते, केवळ टीम इंडियाच या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकेल.'

पाकिस्ताननेही सर्वांना खुश केलंय

पाकिस्तानी टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. एवढंच नाही तर पुढच्या सामन्यात पाकिस्तानी टीमने न्यूझीलंडला 5 विकेट्स राखत हरवलं. उपांत्य फेरीत पोहोचणारा हा संघ पहिला असून अंतिम फेरीत भारत या संघाचा सामना एकदा करू शकतो, असं मानलं जातंय.

पाकिस्तानशिवाय भारताला इंग्लंडकडूनही मोठा धोका आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंमध्येही आत्मविश्वास आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत भारतासोबत इंग्लंडची झुंज सुरूच आहे. तसं, भारतीय संघाने याआधीच सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. परंतु तरीही इंग्लंड संघाला हलक्यात घेता येणार नाही.

पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड मॅचमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला. टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा भारतावर पहिला विजय आहे. टॉस हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय टीमची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने पाकिस्तानला 152 धावांचं लक्ष्य दिले होतं. परंतु पाकिस्तान संघाने 152 धावांचे आव्हान 17.5 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं.