Virat Kohli हा T20 विश्वचषकानंतर निवृत्त होणार! पाकिस्तानी खेळाडूच्या विधानाने खळबळ

विराट कोहलीबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य. पाहा काय म्हणाला.

Updated: Sep 26, 2022, 10:48 PM IST
Virat Kohli हा T20 विश्वचषकानंतर निवृत्त होणार! पाकिस्तानी खेळाडूच्या विधानाने खळबळ title=

मुंबई : टीम इंडियाचा मजबूत फलंदाज विराट कोहलीसाठी आशिया कप 2022 चांगला ठरला. या स्पर्धेपूर्वी तो अतिशय खराब फॉर्ममध्ये होता, पण आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहलीची बॅट चांगली चालली. या सगळ्या दरम्यान एक असे विधान समोर आले आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे विधान विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत आहे.

विराट कोहली नुकताच चांगल्या फॉर्ममध्ये परतला आहे. आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात त्याने पहिले टी-20 शतकही झळकावले. या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे. शोएब अख्तरला विश्वास आहे की विराट कोहली T20 विश्वचषक 2022 नंतर T20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करेल.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर लाईव्ह सत्रादरम्यान विराट कोहलीच्या निवृत्तीवर म्हणाला, 'विराट कोहली टी-20 विश्वचषक 2022 नंतर टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेईल. तो हे करू शकतो जेणेकरून तो क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये जास्त काळ टिकून राहू शकेल. त्यांच्या जागी मी असते तर भविष्याचा विचार करून हाच निर्णय घेतला असता. शोएब अख्तरला विश्वास आहे की एक फॉर्मेट सोडून विराट जास्त काळ क्रिकेट खेळू शकतो.

अलीकडेच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही निवृत्तीचा सल्ला दिला होता. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलशी संवाद साधताना शाहिद आफ्रिदी म्हणाला होता की, 'विराट कोहलीने आपल्या करिअरची चांगली सुरुवात केली होती. त्याने आपले नाव बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो चॅम्पियन खेळाडू आहे. पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही निवृत्तीकडे वाटचाल करत असता आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या करिअरच्या शिखरावर असताना निवृत्तीची घोषणा केली पाहिजे.

T20 क्रिकेटमधील चमकदार व्यक्ती

विराट कोहलीने आतापर्यंत 104 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 51.94 च्या सरासरीने 3584 धावा केल्या आहेत. कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 32 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही 138.37 राहिला आहे. त्याच वेळी, आशिया कप 2022 मध्ये विराट कोहलीने 5 सामने खेळले आणि 92 च्या सरासरीने 276 धावा केल्या. ज्यामध्ये कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 122 धावांची इनिंग खेळली होती.