शतक झळकावल्यावर विराटने Rohit sharma चे का मानले आभार? म्हणाला...

विराटने रोहित शर्माचे आभार मानले आहेत. 

Updated: Sep 9, 2022, 01:28 PM IST
शतक झळकावल्यावर विराटने Rohit sharma चे का मानले आभार? म्हणाला... title=

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात शतकांचा दुष्काळ संपवेल असा अंदाज फार कमी जणांनी वर्तवला असेल. आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये त्याने गुरुवारी दुबईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 1020 दिवसांची प्रतीक्षा संपवली जेव्हा त्याने केवळ 61 बॉल्समध्ये नाबाद 122 रन्स ठोकले. दरम्यान याचं श्रेय त्याने पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकालाही दिलं.

दरम्यान अफगाणिस्तानच्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) विराट कोहलीची खास मुलाखत घेतली. यावेळी त्याने रोहितने विराटला त्याच्या कठीण काळाबद्दल आणि त्यातून कसं कमबॅक केलं याबाबत प्रश्न केले. यावेळी टीमचा प्रमुख म्हणून विराटने रोहित शर्माचे आभार मानले आहेत. 

या मुलाखतीदरम्यान विराट कोहली म्हणाला, "रोहित तुझे खूप खूप आभार. आजचा दिवस आपल्या टीमसाठी खूप खास होता. आपण आजचा सामना कसा खेळतो याचा परिणाम महत्त्वाचा होता. ही टूर्नामेंट टीमसाठी महत्त्वाची होती. या टूर्नामेंटनंतरही आपला ध्येय स्पष्ट आहे, ते म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये होणारा वर्ल्डकप."

मुलाखतीची सुरुवात विराटला म्हणाला की, "तुझी इनिंग खूप स्पेशल आहे, कारण आपल्याला ही स्पर्धा जिंकवून संपवायची होती. तुझ्या इनिंगमध्ये खूप काही पैलू पहायला मिळाले. तर तुझ्या या इंनिंगबद्दल काय सांगशील." याला उत्तर देताना विराटने कर्णधार रोहित शर्माचे आभार मानले आहेत. 

रोहित आणि विराटच्या मुलाखतीचा व्हिडीयो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कोहलीने त्याचे 71 वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली आहे. कोहलीने जवळपास तीन वर्षांच्या खराब फॉर्मनंतर त्याचं पहिलं शतक झळकावलं. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत, कोहलीच्या पुढे फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर 100 शतकं आहेत. त्याचे चाहते त्याच्या या शतकाची 1020 दिवसांपासून वाट पाहत होते.