Virat Kohli Helicopter Shot Video: तो Six लगावल्यानंतर विराटला झाली धोनीची आठवण; अय्यरला म्हणाला, "माही..."

Virat Kohli Helicopter Mahi Shot Video: विराटने 44 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लगावलेल्या उत्तुंग षटकारानंतर क्रिजवर असतानाच उद्गगारले हे शब्द

Updated: Jan 16, 2023, 12:59 PM IST
Virat Kohli Helicopter Shot Video: तो Six लगावल्यानंतर विराटला झाली धोनीची आठवण; अय्यरला म्हणाला, "माही..." title=
Virat Kohli Helicopter Mahi Shot

Virat Kohli Sixes Against Sri Lanka: श्रीलंकेविरुद्ध रविवारी झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात (India vs Sri Lanka 3rd ODI) विराट कोहलीने भन्नाट कामगिरी करत एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीमधील 46 वं शतक (Virat Kohli 46th ODI ton) झळकावलं. मैदानातील जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात चेंडू टोलवत विराटने फलंदाजीचा उत्तम नजराणा पेश केला. विराटने आपल्या खेळीमध्ये आठ षकार आणि 13 चौकार लगावले. त्याने शुभमन गिलबरोबर 131 धावांची पार्टनरशीप केली. शुभमननेही 97 चेंडूंमध्ये 116 धावांची खेळी केली तर विराट 166 धावा करुन नाबाद राहिला. 110 चेंडूंमध्ये विराटने केलेल्या भन्नाट खेळीमुळे भारताला 390 धावांचा डोंगर उभारता आला. 391 धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांचा संघ 73 धावांवर तंबूत परतला. भारताने 317 धावांनी विक्रमी विजयाची नोंद करत 3-0 ने मालिका खिशात घातली. 

आपल्या खेळीदरम्यान कोहलीने लगावलेला एक षटकार अगदी महेंद्र सिंग धोनीची आठवण करुन देईल असा होता. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची (Dhoni helicopter shot) आठवण करुन देणारा हा फटका मारल्यानंतर खुद्द कोहलीनेच 'माही शॉट' असं समोर फलंदाजी करत असलेल्या श्रेयस अय्यरला सांगितल्याचं कॅमेरात कैद झालं. विराटने मारलेला हा चेंडू 97 मीटर दूर पडला. कसून राजिथा  44 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विराटने हा षटकार लगावला.

विराटने लगावलेल्या या षटकाराचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत विराटला हा फटका मारल्यानंतर धोनीची आठवण झाल्याचं म्हटलं आहे. "तो (विराट) शेवटी म्हणाला 'माही शॉट'" अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या शतकासहीत विराटने भारतात खेळताना सर्वाधिक शतकं करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याचप्रमाणे एकाच संघाविरोधात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही विराटने स्वत:च्या नावे करुन घेतला आहे. हा विक्रम पूर्वी सचिनच्या नावे होता.