Virat Kohli: "दारू पिल्यानंतर मी...", अनुष्कासमोर विराटने सांगितला 'तो' मजेशीर किस्सा!

Virat Kohli Video: पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) रॅपीड फायर सत्रात भाग घेत विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या जुन्या 'ड्रिंकिंग डे' (Drinking Days) मधील आठवणी ताज्या केल्या. म्हणाला...

Updated: Mar 27, 2023, 07:28 PM IST
Virat Kohli: "दारू पिल्यानंतर मी...", अनुष्कासमोर विराटने सांगितला 'तो' मजेशीर किस्सा! title=
Virat Kohli,Anushka Sharma,

Virat Kohli On Drinking Days: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे दोघेही नुकतंच इंडियन स्पोर्ट्स ऑनर या इव्हेंटमध्ये पोहोचले होते. त्यावेळी दोघांनी कार्यक्रमात धमाल केली. नुकत्याच ऑस्कर पुरस्काराने सन्मानित नाटू नाटू (Natu Natu Dance) गाण्यावर विराट आणि अनुष्काने ठेका धरला. त्याचा व्हिडिओ (Viral Video) तुफान व्हायरल होतोय. अशातच त्याचवेळी मुलाखत देताना विराटने त्याच्या ड्रिकिंग डेजच्या (Drinking Days) आठवणी ताज्या केल्या आहेत.

विराट कोहली त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. त्यामुळे तो अनेक युवा खेळाडूंच्या गळ्यातील ताईत आहे. कोहलीने त्याच्या फिटनेसवर (Virat Kohli Fitness) भरपूर मेहनत घेतलीये. मात्र, आपल्या तारुण्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. त्याचबरोबर खुप कमी लोकांना त्याच्या दारू पिण्याच्या सवयीविषयी माहिती आहे. आत्ता विराट पीत नसला तरी तो तरुण वयातील आठवणींना उजाळा देतो. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा रॅपिड-फायर राऊंडमध्ये खेळत होते. त्यावेळी विराटने रोखठोक उत्तर दिली.

काय म्हणाला Virat Kohli ?

"डान्स फ्लोअरवर जास्त कोण टिकतं?", असा सवाल उपस्थित केला गेला. त्यावेळी अनुष्काने कोहलीच्या दिशेने बोट दाखवलं. अनुष्काच्या उत्तराने विराट गोंधळला आणि मी? असा प्रश्नार्थक चेहरा केला. त्यावर अनुष्काने डान्स फ्लोअर (Virat Kohli Dance) असं उत्तर देत हो, असं प्रत्युत्तर दिलं. 

आणखी वाचा -  IPL 2023: KKR कडून अचानक नव्या कॅप्टनची घोषणा; 'या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी!

त्यावर, जर मी पार्टीला (Virat Kohli Party) गेल्यावर दोन ड्रिंक्स घेतली असेल, तर हो..., असं विराट म्हणतो. दोन पेक्षा जास्त झाली तर मी डान्स फ्लोअर काबीज करतो, असं विराट म्हणतो. मी आता पीत नाही, पण ज्यावेळी मी पीत होतो, तेव्हा तर नक्कीच.. दोन-तीन ड्रिंक्सनंतर मला लोकं काय म्हणतील याचा फरक पडत नाही, असं विराट म्हणाला आहे. 

पाहा VIDEO -

दरम्यान, कोण जास्त कोणाला सरप्राईस दिलं? असा प्रश्न विचारल्यावर अनुष्काने प्रामाणिकपणे विराटचं नाव घेतलं. त्यावर विराटने एअरपोर्टचा किस्सा देखील सांगितला. येत्या काही दिवसात आयपीएलचा 16 वा (IPL 2023) हंगाम सुरू होणार असल्याने कोहली सध्या बंगळुरूमध्ये आहे. आरसीबीच्या (RCB) खेळाडूंसह तो मैदानात घाम गाळत असल्याचं दिसतंय.