विराटचा पुन्हा धमाका, डरबनमध्ये एकत्र केले इतके रेकॉर्ड

टेस्ट सीरिजमध्ये १-२ ने मात मिळाल्यानंतर टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या वनडेत दणदणीत विजय मिळवला.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 2, 2018, 10:23 AM IST
विराटचा पुन्हा धमाका, डरबनमध्ये एकत्र केले इतके रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : टेस्ट सीरिजमध्ये १-२ ने मात मिळाल्यानंतर टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या वनडेत दणदणीत विजय मिळवला.

टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला ६ विकेटने मात दिली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या ११२ आणि अजिंक्य रहाणेच्या ७९ रन्सने या विजयात मोठी भूमिका बजावली. यासोबतच विराटने या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले. 

विराटच्या एका शतकाने बनले ५ रेकॉर्ड

- डरबनमध्ये विराट कोहलीने आपल्या वनडे करिअरचं ३३वं शतक लगावलं आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विरोधक टीमने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करत विराटच्या बॅटने झालेलं हे १८वं शतक आहे. 

- डरबानमध्ये याआधी टीम इंडियाला कधीही विजय मिळाला नाही. ही पहिलीच वेळ होती की, डरबनमध्ये टीम इंडियाला विजय मिळाला.

- या सामन्याआधी डरबनमध्ये भारताचा सर्वाधिक स्कोर २५० रन्स होता. या सामन्यात टीम इंडियाने २७० रन्सचं टार्गेट ४५व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. 

- २०३ वनडे सामन्यात विराट कोहलीने ३३वं शतक लगावलं. त्याबरोबर त्यांची शतक लगावण्याची सरासरी प्रत्येक सहा सामन्याची झाली आहे.  

- कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या ४१व्या सामन्यात हे ११वं शतक होतं. याआधे सौरव गांगुलीने कर्णधार म्हणून १४२ सामन्यात केले होते. तर रिकी पॉंटिंगने २२ आणि एबी डिविलियर्सने कर्णधार म्हणून १३ शतक लगावले आहेत. 

विराट-अजिंक्यच्या भागीदारीने उडवला धुव्वा

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने साऊथ आफ्रिकेकडून देण्यात आलेल्या टार्गेटवर पाणी फेरलं. सुरुवातीला रोहित शर्मा २० रन्स करून आऊट झाला आणि ३५ रन्स केलेल्या शिखर धवन यानेही चांगला प्रयत्न केला. मात्र नंतर विराट आणि अजिंक्य या जोडीने चौथ्या विकेटसाठी १८९ रन्सची दमदार भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडिया २७० रन्सचं टार्गेट ४५.३ ओव्हरमध्ये पूर्ण करू शकली.