दुबई : न्यूझीलंड ICC T20 वर्ल्डकप 2021 विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर ट्रोल्सला धारेवर धरलं आहे. काही ट्रोलर्सने अगदी खालची पातळी गाठली आहे. मात्र सोशल मीडिया ट्रोलिंग आणि इतरांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देत नसल्याचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे.
विराट कोहली म्हणाला, “अनेक लोकं सोशल मीडियावर आपली ओळख लपवतात आणि नंतर खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात खालची पातळी आहे. त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे, त्यामुळेच ते हे सर्व नाटक करतात. खेळाडूंना सपोर्ट कसा करायचा हे आम्हाला माहीत आहे. सोशल मीडिया ट्रोलिंगला आमच्यासाठी महत्त्व नाही."
ICC T-20 वर्ल्डकप 2021च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर मोहम्मद शमी आणि टीम इंडियाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. यावर आता विराट कोहलीने मौन सोडलंय.
ट्रोलर्सला बोलताना विराटने गोलंदाज मोहम्मद शमीला पाठिंबा देत धर्माच्या आधारावर ट्रोल करू नका असं म्हटलंय. कोहली पुढे म्हणाला, "शमीला टार्गेट करणं चुकीचं आहे. खेळाडूंनी टार्गेट करू नका. मैदानाबाहेरील नाटकांकडे आम्ही लक्ष देत नाही. एक कसे व्हायचं ते आम्हाला माहित आहे."