Virat Kohli: विराट कोहलीची मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य!

Virat Kohli Instagram Story: एकही सिक्स न मारता सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा शुभमन गिल आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरलाय. अशातच विराटने आयपीएलमध्ये (IPL 2023) शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलचं (Shubhman Gill) देखील कौतूक केलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 16, 2023, 10:20 PM IST
Virat Kohli: विराट कोहलीची मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य! title=
Virat Kohli On Shubhman Gill

Virat Kohli On Shubhman Gill: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या अनोख्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर आरसीबीने अनेक सामने जिंकलेत. तसेच आगामी सामन्यात दमदार कामगिरी करून प्लेऑफमध्ये संघाला कसं पोहोचवता येईल, याची तयारी विराट अँड कंपनी करता दिसतीये. या आयपीएलमध्ये विराट युवा खेळाडूंचं कौतूक करताना दिसतोय. तसेच त्यांना सपोर्ट करताना दिसतोय. सामन्यानंतर कुठं चूक झाली? याचा पंचनामा करत आहे. अशातच विराटने आयपीएलमध्ये (IPL 2023) शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलचं (Shubhman Gill) देखील कौतूक केलंय.

 सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज शुभमन गिलने  (Shubhman Gill Century) 58  चेंडूत आयपीएलमधील पहिलं शतक झळकावलं. त्याचबरोबर आयपीएल 2023 मध्ये शतक ठोकणारा शुभमन हा 6 वा फलंदाज ठरला आहे. शुभमन गिलने 58 चेंडूत 101 धावांची कामगिरी केली अन् यावेळी त्यानं 13 फोर आणि 1 सिक्स देखील खेचला. एकही सिक्स न मारता सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा शुभमन गिल आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरलाय. त्यामुळे त्याच्या कामगिरीचं सर्वत्र कौतूक होताना दिसतंय. त्यानंतर किंग कोहलीने शुभमनसाठी खास स्टेट्स ठेवलं.

काय म्हणाला विराट कोहली?

जिथं क्षमता आहे तिथं गिल आहे. आयुष्यात आणखी पुढे जा आणि पुढच्या पिढीचं नेतृत्व कर. शुभमन गिल तुला आशीर्वाद, अशी पोस्ट विराटने केली आहे. पुढील पिढीचं नेतृत्व कर म्हणत विराटने (Virat Kohli On Shubhman Gill) मोठे संकेत दिले आहेत.

Virat Kohli On Sachin Tendulkar: '...तेव्हा मला लाज वाटते', सचिनचं नाव घेत विराट स्पष्टच बोलला!

World Cup 2023 मध्ये होणार Rishabh Pant चं पुनरागमन? महत्त्वाची माहिती समोर!

पाहा पोस्ट -

दरम्यान, शुभमनने आतापर्यंत (Shubhman Gill, IPL 2023) आयपीएलमध्ये 87 मॅचमध्ये 2476 धावा केल्या आहेत. शतक ठोकून शुभमनने सूर्यकुमार यादव, प्रभसिमरन सिंह, हॅरी ब्रुक, व्यंकटेश अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या यादीत स्थान मिळवलंय. यंदाच्या हंगामात शुभमनने 13 सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने आणि 146 च्या स्ट्राइक रेटने 576  धावा केल्यात. याच एका शतकरासह 4 अर्धशतक देखील आहे.