नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली काऊंटी क्रिकेट आणि इंग्लंड दौऱ्याबाबत गोंधळलेला होता. मात्र बीसीसीआयने आता यावर स्पष्टीकरण दिलेय. बीसीसीआयच्या मते थकवा आणि दुखापतीमुळे विराट काऊंटी क्रिकेटमधील काहीच सामने खेळू शकणार. कोहली रुग्णालयात दिसल्याने त्याच्या दुखापतीबाबत शंका व्यक्त केली जात होती. कोहली चेकअपसाठी मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये गेला होता त्यानंतर बातमी आली की त्याला स्लिप डिस्क झालाय आणि तो इंग्लंड दौऱ्याआधी होणाऱ्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाही.
मीडिया रिपोर्टनुसार मुंबईच्या ऑर्थोपिडिक सर्जनने विराटला इंग्लंड दौऱ्यातील काही सामन्यात खेळता येणार नाही हेही सांगितले होते. विराटच्या स्पायनल नर्व्हमध्ये समस्या असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिलेला नाहीये.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या मानेला दुखापत झाली असून त्याला स्लिप डिस्क झालेला नाहीये. विराटला थकवा जााणवतोय. त्याला स्लिप डिस्क झालेला नाहीये. त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहोत. काऊंटी क्रिकेटमध्येही त्याच्यावर अधिक भर पडणार नाही याची काळजी घेऊ.
स्लिप डिस्कबाबत विचारले असता अधिकारी म्हणाले, विराटने कालच सरकारच्या फिटनेस चॅलेंजअंतर्गत फिटनेस व्हिडीओ शेअर केलाय.