दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली विजयानंतर ही नाराज आहे. त्याने म्हटले की, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सुपर ओव्हरमधील विजयामुळे संघाला आत्मविश्वास मिळाला. सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये मुंबईला पराभूत केले. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला आहे की, 'या सामन्यातून संघ बर्याच सकारात्मक गोष्टी शिकेल.'
दोन्ही संघांनी 201 धावा केल्या आणि सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करत सात धावा केल्या. बंगळुरूने आठ धावा करुन सामना जिंकला. सामना संपल्यानंतर कोहली म्हणाला की, आम्हाला हवे ते अंमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला मैदानावर जवळचा विजय मिळाला. पण छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आम्हाला यावर लक्ष केंद्रित करायचं आहे.'
सुपर ओव्हरबाबत कोहली म्हणाला की, 'मला वाटले की दोन सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण आहेत आणि म्हणून मी आणि डिव्हिलियर्स गेलो. मैदानावर येऊन जबाबदारी घेण्याची ही बाब आहे. आम्हाला फिल्डिंगवर काम करण्याची गरज आहे, तो कॅच पकडला असता तर सामना इतका जवळचा झाला नसता.' मुंबईकडून ईशान किशनने 99 आणि किरोन पोलार्डने 24 चेंडूंत 60 धावा केल्या होत्या.
रोहितने म्हटलं की, 'हा क्रिकेटचा एक चांगला सामना होता. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमच्यात कोणत्याही प्रकारे सामना नव्हता. किशनने शानदार डाव खेळला आणि मग पोलार्डने. आम्ही चांगली सुरुवात करू शकलो नाही. मला वाटते की आम्ही 200 धावांचे लक्ष्य गाठू शकू. या सामन्यात आम्हाला पहिल्या सहा-सात षटकांत लय सापडली नाही. आम्ही तीन गडी गमावले.'
रोहित म्हणाला, 'पोलार्ड तिथे असताना काहीही होऊ शकते. ईशान देखील चांगला खेळ करत होता. म्हणून आम्हाला खात्री होती की आपण जिंकू. किशनला सुपर ओव्हरमध्ये न पाठविण्याबाबत रोहित म्हणाला की, 'किशन खूप थकला होता. आम्हाला वाटले की त्याला पाठवायला हवं. पण हार्दिक पांड्या हा एक असा खेळाडू आहे जो मोठे शॉट खेळू शकतो. पण तो खेळू शकला नाही.'