मुंबई : आशिया कप 2022 उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. येत्या 28 तारखेला भारतचा पाकिस्तानशी सामना होणार आहे. इंग्लंडच्या दौऱ्यानंतर विराट कोहली या टुर्नामेंटसोबत मैदानात पुन्हा एकदा दिसणार आहे. मैदानात पुन्हा ताकतीने उतरण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) प्रचंड मेहनत घेत आहे. विराट कोहली आणि फिटनेस हे एक कायम चर्चेत असणारं समीकरण तयार झालं आहे. असं असलं तरी यामागे त्याची खुप मेहनत लपलेली आहे.
दमदार एन्ट्री घेण्यासाठी त्याने त्याच्या रुटीनमध्ये मोठा बदल केला आहे. विशेषत: डायटच्या बाबतीत विराट अत्यंत कठोर झाला आहे. आशिया कपच्या आधी विराट पाच तास जीम आणि नेट प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ दितोय. त्यासोबतच, जेवणामध्ये प्रोसेस्ड शुगर पुर्णपणे बंद टाळतोय.
विराटने माध्यमांशी बोलताना सांगितलं की," एक काळ असा होता की मी फिटनेस आणि डायटवर लक्ष देत नव्हतो, पण आता मात्र मी डायटवर विशेष लक्ष देणं सुरु केलं आहे. उत्तम फिटनेससाठी मी काय खायला हवं काय नको याकडे मी जाणीवपूर्वक लक्ष देतोय. मी प्रोसेस्ड शुगर, ग्लुकन, यासोबतच डेरी प्रोडक्ट्सचं सेवन करणं टाळतो."
विराट कोहलीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो वेटलिफिंग करताना दिसतो आहे. येऊ घातलेल्या आशिया कप 2022 साठी विराट कोहली खुप मेहनत घेतोय. त्याने घेतलेल्या मेहनतीमुळे तो पुन्हा मैदान गाजवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये.