Virat Kohli: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) शेवटचा चौथा सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय कांगारूंसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. सिरीजचा हा शेवटचा सामना असून विराट कोहलीचे चाहते त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करतायत. दरम्यान आजच्या सामन्यात फिल्डींगच्या वेळी विराट कोहलीचं एक कृत्य कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांना खटकू शकतं.
चौथ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. यावेळी उस्मान ख़्वाजाने शतक ठोकलं तर कॅमरून ग्रीन अर्धशतकाच्या जवळ आहे. दरम्यान उस्मान ख्वाजा आणि कांगारूंचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) यांनी दोघांनी उत्तम पार्टनरशिप करत चांगला खेळ उभा केला. या दोघांची जोडी तोडणं टीम इंडियाच्या गोलंदाजांसाठी मोठं आव्हान होतं.
स्मिथची विकेट जावी यासाठी विराट कोहलीने एक प्रयत्न केला. ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 50 व्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर विराट कोहली (Virat Kohli) ने ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथसोबत मस्करी केली. गोलंदाज मोहम्मद शमीने स्टीव स्मिथ (Steve Smith) ला गुड लेंथ बॉल टाकला. ज्यावर स्मिथने स्ट्रेट शॉट खेळला. या बॉलला शमीचा हात लागला आणि तो बॉल थेट स्टंपवर जाऊन लागला. यावेळी कोहलीने लगेच मस्करीच्या मूडमध्ये रिव्ह्यू घेण्याचा इशारा करू दाखवला,
यावेळी नॉन स्ट्रायकर एंडवर उभा असलेला ख्वाजा रन आऊट झाला असं सर्वांना वाटलं. मात्र ख्वाजाची बॅट क्रीजच्या आत असल्याने त्याचा काहीही परिणाम झाला नाही. यानंतर विराट कोहलीची रिएक्शन पाहण्यासारखी होती. दरम्यान रोहितला न विचारताच कोहलीने हा रिव्ह्यू घेतला कारण, त्याने मस्करीच्या मूडमध्ये याची मागणी केली होती.
King ki harkat pic.twitter.com/5Ok7pg11UI
— javed ansari (@javedan00643948) March 9, 2023
अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या टेस्ट सामन्यात मोठे निर्णय घेत रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिलसह टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसणार आहे आहे. चौथ्या टेस्टमधून पुन्हा एकदा के.एल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी फायदेशीर ठरल्याचंही दिसून आलं.