विराटच्या दाढीला विम्याचे कवच? (व्हिडिओ)

आपल्या मैदानावरली खेळीबाबत नेहमीच दक्ष असलेला विराट आपल्या स्टायलीश लूकबाबतही तितकाच दक्ष असतो.

Updated: Jun 9, 2018, 09:35 AM IST
विराटच्या दाढीला विम्याचे कवच? (व्हिडिओ) title=
छायाचित्र सौजन्य: विराट कोहली / ट्विटर

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गंभीर दुखापतीमुळे सध्या तो विश्रांतवर आहे. पण, आपण लवकरच पुनरागमण करणार असल्याचे त्याने केव्हाच सांगितले आहे. दरम्यान, आपल्या मैदानावरली खेळीबाबत नेहमीच दक्ष असलेला विराट आपल्या स्टायलीश लूकबाबतही तितकाच दक्ष असतो. खास करून आपल्या दाढीबद्दल. आपली दाढी चाहत्यांना भारी आवडत असल्याची जाणीव त्यालाही असल्यामुळे असेल कदाचीत. पण, काही असले तरी विराटच्या दाढीचा प्रभाव अनेक नवोदीत क्रिकेटर्स आणि त्याच्या चाहत्यांवरही आहे. अशा या विराटच्या लक्ष्यवेदी दाढीची विशेष चर्चा सध्या रंगली आहे. त्याने म्हणे आपल्या दाढीचा विमा उतरवला आहे.

के एल राहुलने शेअर केला व्हिडिओ

अर्थात, दाढीचा विमा खरोखरच उतरवला आहे किंवा नाही याबाबत स्वत: विराटने अद्याप तरी कोणते भाष्य केले नाही. पण, क्रिकेटर के एल राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडित दिसते की, सोफ्यावर बसलेल्या विराट कोहलीचा दोन व्यक्ती फोटो काढत आहेत. तसेच, त्यातील एका व्यक्तिने विराटच्या दाढीचा एक केस कापून प्लॅस्टिकच्या हवाबंद बॅगमध्ये ठेवल्याचे दिसते. व्हिडिओ पाहता हा व्हडिओ एक सीसीटीव्ही फुटेज असल्याचे दिसते. दरम्यान, हा व्हिडिओच के एल राहुलने ट्विटरवर शेअर केला असून, त्याखाली एक संदेशही लिहीला आहे. या संदेशात‘मला माहित होतं तुझं तुझ्या दाढीवर प्रचंड प्रेम आहे, पण आता तिचा विमा काढून तू माझी थिअरी खरी ठरवली आहेस’, असे राहुलने म्हटले आहे.

खरं, खोटं विराटलाच माहित...

व्हिडिओच्या शेवटी विराट करारपत्रासारख्या एका कागदावर सहीही करताना दिसतो. पण, ही सही नेमक्या कोणत्या कारणासाठी आहे. त्याने खरोखरच आपल्या दाढीचा विमा उतरवला आहे का याबाबत कोणतीही माहिती अथवा खुलासा पुढे आला नाही. स्वत: विराटनेही त्यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. त्यामुळे विराटच्या दाढीच्या विम्याबाबत सध्या तरी संभ्रम आहे. खरे खोटे विराटलाच माहीत.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x