डेहराडून : अफगाणिस्तानने दमदार खेळाच्या जोरावर बांगलादेशला हरवून आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सीरिजमध्ये क्लीन स्वीप करताना ऐतिहासिक विजय मिळवला. गुरुवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यांत स्पिनर रशिद खानच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशला एका धावेने हरवून सीरिज ३-० अशी जिंकली. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद १४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला १४४ धावा करता आल्या.
बांगलादेशने अफगाणिस्तानला चांगली टक्कर दिली. दरम्यान रशीदच्या दमदार गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संपूर्ण डाव कोसळला आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने एका धावेने विजय मिळवला. अखेरच्या षटकांत बांगलादेशला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती. मात्र रशीद खानने या षटकांत केवळ सात धावा देताना एका धावेने विजय मिळवून दिला.
बांगलादेशकडून मुशफिकुर रेहमानने सर्वाधिक ३७ चेंडूत ४६ धावा केल्या. मात्र अखेरच्या ओव्हरमधील रशीद खानच्या पहिल्याच चेंडूत शिकार ठरला.
&n
Afghanistan beat Bangladesh in the final T20I match to win the series 3-0 #AFGvBAN pic.twitter.com/NI39CLybze
— Afghan Cricket Board (@ACBofficials) June 7, 2018
याआधी १४५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही. पहिल्या दोन ओव्हर चांगल्या झाल्या मात्र तमीम इक्बाल केवळ पाच धावा देऊन बाद झाला. त्यानंतर बांगलादेशचे खेळाडू बाद होत गेले.
सौम्या सरकार (ऍ५) आणि लिटोन दास(१२) हे वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात बाद झाले. यानंतर कर्णधार शाकिब अल हसनने १० धावा केल्या.