विराट कोहलीला थेट पाकिस्तानातून आल्या शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 12, 2017, 12:18 PM IST
विराट कोहलीला थेट पाकिस्तानातून आल्या शुभेच्छा title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत.

इटलीमध्ये हा लग्न सोहळा सुरु आहे. टस्कनीमधील बोर्दो फिनोशोतो रिसॉर्टमध्ये हा विवाह झाला. विवाहानंतर सामान्यांपासून दिग्गज व्यक्तींपर्यंत सर्वांनी विराटला विवाहाच्या शुभेच्छा दिल्या. सिनेअभिनेत्यांपासून क्रिकेटर्सने देखील विराट आणि अनुष्काला विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाकिस्तानातून शुभेच्छा

विराट कोहलीला थेट पाकिस्तानातून देखील शुभेच्छा आल्या आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने विराट आणि अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.