कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडत विराटने तोडलं पेप्सीशी नातं, काय यामागचं कारण?

किंग कोहली आता पेप्सीच्या जाहिरातीत दिसणार नाही, काय यामागचं कारण? 

Updated: Jun 23, 2021, 10:06 AM IST
कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडत विराटने तोडलं पेप्सीशी नातं, काय यामागचं कारण?  title=

मुंबई: दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्ड आपला सामना आणि कामगिरीसोबतच कोका कोलाची बाटली बाजूला सरकवल्या प्रकरणी खूप चर्चेत आले होते. त्यावरून सोशल मीडियावर देखील खूप चर्चा रंगली होती. त्याने कोका कोला सोडून पाण्याच्या बाटलीचं समर्थन केलं होतं. त्यानंतर कोका कोलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आता विराट कोहली देखील पुन्हा एकदा चर्चेत आला. याचं कारण म्हणजे पेप्सी कंपनीच्या जाहिरातीत विराट कोहली आता दिसणार नाही. यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया. 

आता विराट कोहलीनं कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडून विराट कोहलीनं पेप्सीसोबत नातं तोडलं आहे. 2017मध्ये विराट कोहलीनं पेप्सी कंपनीसोबत एक करार केला होता. हा करार 6 वर्षांसाठी होता. विराटच्या या करारानंतर फिटनेस फ्रिक विराट स्वत: हे ड्रिंक पित नसल्यानं सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आणि चर्चा रंगल्या. 

टीम इंडियाचा कर्णधार कोहली स्वत: ड्रिंक पित नाही तरी तो का जाहिरात करतो असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. फिटनेस फ्रिक विराटनं एका मुलाखतीमध्ये म्हटलं की तो या ब्रॅण्डसोबत स्वत:ला मनापासून कनेक्ट करू शकत नाही. त्यामुळे मी या गोष्टीपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचं विराट म्हणाला. 

विराट कोहली जे ब्रॅण्ड स्वत: वापरतो किंवा ज्या गोष्टी तो आपल्या दैनंदिन आयुष्यात करतो त्याच्याशी निगडित ब्रॅण्डसोबत काम करण्याचा विचार आता किंग कोहलीनं केला आहे. त्याच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांनी स्वगत केलं आहे. मी लोकांना तेच देऊ इच्छीतो जे मी वापरतो असं विराट एका मुलाखती दरम्यान म्हणाला. 

 पेप्सी कंपनीसोबत मी पुन्हा कॉन्ट्रॅक्ट न करण्याचा निर्णय मी घेतला असं विराट कोहली म्हणाला. विराटने आपल्या फिटनेसकडे लक्ष देत सॉफ्ट ड्रिंक आणि जंक फूड पूर्णपणे सोडलं आहे. त्यामुळे आता अशा ब्रॅण्डसोबत विराट पुन्हा जाणार नसल्याचं त्याने ठरवलं आहे.