लग्नाची पार्टी ग्लेन मॅक्सवेलची; चर्चा मात्र विराट कोहलीची, पाहा व्हिडीओ

गेल्या वर्षीपासून विराट कोहलीच्या बॅटमधून धावा काही निघताना दिसत नाहीत. आयपीएलमध्येही कोहली सतत खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीने चाहत्यांनी मैदानावर निराशा केली तरी सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चेत आहे. 

Updated: Apr 28, 2022, 02:23 PM IST
लग्नाची पार्टी ग्लेन मॅक्सवेलची; चर्चा मात्र विराट कोहलीची, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई: गेल्या वर्षीपासून विराट कोहलीच्या बॅटमधून धावा काही निघताना दिसत नाहीत. आयपीएलमध्येही कोहली सतत खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीने चाहत्यांनी मैदानावर निराशा केली तरी सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चेत आहे. 

ग्लॅन मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत विराट कोहली आणि बंगळुरूची टीम तुफान मजा करताना दिसली. यावेळी कोहली देखील पार्टीमध्ये डान्स करताना दिसला. गेल्या काही दिवसांपासून कोहली खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. त्याला ब्रेक देण्याची मागणी केली जात आहे. 

या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र कोहली हॉटेलवर मजा करत असल्याचं दिसत आहे. विराट कोहलीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. विराट आणि अनुष्कानं या पार्टीत हजेरी लावली होती. 

अनुष्काचा बदलेला लूक पाहून चाहते थोडे नाराज झाले. मात्र विराट कोहलीच्या डान्सने ग्लॅनच्या पार्टीला रंगत आणली. यावेळी बंगळुरू टीमचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसीस देखील डान्स करताना दिसला आहे. 

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात बंगळुरू टीमने आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले तर 4 सामने गमवले आहेत. बंगळुरू टीम पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. यंदा बंगळुरू प्लेऑफपर्यंत पोहोचते का? याची उत्सुकता आहे.