२१ वर्षानंतर या क्रिकेटरने वानखेडेवर केला हा कारनामा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 281 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बळी गमावून 280 धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने 125 चेंडूत 121 धावा काढल्या.

Updated: Oct 23, 2017, 12:02 PM IST
२१ वर्षानंतर या क्रिकेटरने वानखेडेवर केला हा कारनामा title=

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 281 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बळी गमावून 280 धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने 125 चेंडूत 121 धावा काढल्या.

कोहलीच्या या शतकासोबतच वानखेडे स्टेडिअमची 21 वर्षापासूनची प्रतिक्षा संपली आहे. वानखेडे मैदानावर वनडे सामन्यात 21 वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने शतक ठोकले आहे. यापूर्वी 1996 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन तेंडुलकरने शतक झळकवले होते. 21 वर्षांनंतर एका भारतीयाने वानखेडे मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक केलं आहे.

कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा 30 शतकांचा विक्रम मोडला आहे. आणखी एक अद्वितीय रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला आहे. कोहली 200 व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये शतक ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू एबी डिव्हिलियर्सने 200 व्या सामन्यात शतक झळकावले होते.